Ganeshotsav 2023 : जळगावातही साकारू लागल्या 25 फुटी गणेशमूर्ती! राणा मूर्तिकारांची कमाल

School children looking at the big Ganesha idol made by city sculptors Rana brothers.
School children looking at the big Ganesha idol made by city sculptors Rana brothers. esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे गणेशमूर्ती बनविण्यासह उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.

एरवी नंदुरबार, अमरावती, बऱ्हाणपूर येथून जळगाव जिल्ह्यात भव्य मूर्ती आणल्या जायच्या; मात्र येथील राणा मूर्तिकारांनी जळगावातच २५ ते ३० फूट भव्य मूर्ती बनविणे सुरू केल्याने या मूर्तींना अन्य ठिकाणांहून मागणी वाढत आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. यंदा दर वर्षीपेक्षा काहीसा उशिरा हा उत्सव येत आहे. (ganeshotsav 2023 25 feet Ganesha idols started to be made in Jalgaon news)

यंदाच्या वर्षी श्रावणाच्या आधी अधिक मास असल्यामुळे साधारण दहा ते पंधरा दिवस सर्वच सण-उत्सव पुढे ढकलले गेले. त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव सप्टेंबरच्या १९ तारखेपासून सुरू होतोय. त्यादृष्टीने आता मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

जळगावातही भव्य मूर्ती

जळगाव शहरासह जिल्ह्यातील मोठी मंडळं दर वर्षी मोठ्या मूर्ती आणण्यावर भर देतात. साधारण २० फुटांपेक्षा जास्त उंच मूर्ती याआधी जळगावात बनत नव्हत्या. त्या साधारणपणे बऱ्हाणपूर, अमरावती, नंदुरबार यांसह मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण, कोकणातून आणल्या जात होत्या. गेल्या काही वर्षांत मात्र येथील राणा कुटुंबीयांनी या भव्य मूर्ती बनविणे सुरू केले.

राणा कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षक मूर्ती बनवितात. त्यांच्या मूर्तींना जळगाव जिल्ह्याबाहेरूनही चांगली मागणी असते. यंदाही राणा कलावंत मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

School children looking at the big Ganesha idol made by city sculptors Rana brothers.
Ganeshotsav : गणेश मंडळांचा गेल्या वर्षीचाच परवाना २०२६ पर्यंत चालणार
रिंगरोडवर गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे.
रिंगरोडवर गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे.esakal

या वर्षी नाशिकच्या एका मंडळासाठी राणांकडून २५ फुटांची मूर्ती नुकतीच रवाना करण्यात आली. अन्य काही भव्य मूर्तीही बनविल्या जात असल्याचे मूर्तिकार राजू राणा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मूर्तींचे दर वाढणार

गणेशमूर्ती यंदा गेल्या वर्षीपेक्षा महाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोकणात पावसाळ्याच्या प्रारंभीच अतिवृष्टी झाली. या आपत्तीत मूर्तिकारांचा कच्चा माल, साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे मालासह मूर्ती महाग झाल्या. जळगावातील मूर्तिकार कोकणातून व अन्य ठिकाणांहून कच्चा माल मागवितात. तो महाग झाल्याने मूर्तींचे दर ३० टक्के वाढण्याची शक्यता आहे.

मंडळांचे बुकिंग सुरू

चांगल्या मूर्तींना बाजारात मोठी मागणी असते. जळगाव शहरातील गणेशोत्सव नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. आकर्षक व भव्य मूर्ती प्रतिष्ठापनेवर अनेक मंडळांचा कल वाढला आहे. त्यामुळे या भव्य मूर्तींना मागणी वाढल्यामुळे काही मंडळांनी चार-सहा महिने आधीच मूर्तींची बुकिंग करून ठेवली आहे.

राणा बंधूंकडूनच नव्हे, तर बऱ्हाणपूर, नंदुरबार येथूनही मूर्ती आणल्या जात आहेत. तर काही मंडळांनी मूर्ती आणूनही ठेवल्या आहेत. प्रतीक्षा आहे ती केवळ आता बाप्पाच्या आगमनाची.

School children looking at the big Ganesha idol made by city sculptors Rana brothers.
Ganeshotsav 2023: पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य! ग्राहकांकडून बुकिंगला सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com