जळगाव पुन्हा गँगवॉरच्या वाटेवर? गोळीबार झाल्याच्या चर्चेला उधाण

या घटनेमुळे जळगाव शहर पुन्हा एकदा गँगवारच्या वाटेवर जात असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
shootout affected Bike
shootout affected Bikeesakal
Updated on

जळगाव : शहरातील महाबळ कॉलनी जवळील डॉ. झाकिर हुसैन कॉलनीतील नलिनी तायडे यांच्या घरावर पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास हल्ला चढवुन अज्ञात टोळक्याने आरडाओरड, शिवीगाळ करत दगडफेकीसह गोळीबार केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी यावेळी घराबाहेर उभ्या दुचाकी फोडण्यात आल्या. त्यामुळे जळगाव शहर पुन्हा एकदा गँगवार (Gangwar) च्या वाटेवर जात असल्याच्या चर्चांना या घटनेमुळे जोर आला आहे.

जळगाव शहरातील महाबळ परिसरात झाकिर हुसेन कॉलनीत नलिनी विलास तायडे या मुलगा विनोद, सतीश आणि कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तायडे कुटूंबाचे परिसरात बऱ्यापैकी वर्चस्व असून यापुर्वीही त्यांच्या घराजवळ हाणामारीच्या घटना घडल्‍या असून त्यांच्या विरोधातील गटाशी झालेल्या हल्ला प्रतीहल्ल्याचे गुन्हेही दाखल झाले होते. अशातच बुधवारी (ता. २७) पहाटे २.४५ च्या सुमारास तायडे कुटूंबीयांच्या घराबाहेर वाहनांतुन अज्ञात टोळके आले. त्यांनी शिवीगाळ करीत घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. या टोळीच्या हातात लाकडी दांडके, दगडं घेत प्रचंड आरडाओरड करुन परिसर दणाणुन सोडला. तायडे यांच्या घराबाहेर उभ्या दोन वाहनांवर लाकडी दांडके व दगडांनी माराकरुन फोडण्यात आल्या. नलिनी तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर टोळके त्यांचा मुलगा विनोद आणि सतीश तायडे यांना मारण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु दोन्ही मुले लग्नानिमीत्त बाहेरगावी गेले असल्याने घरी कोणीही नव्हते.

shootout affected Bike
जळगाव : अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेलिंग


गोळीबाराचे दोन छिद्र?

तायडे यांच्या घराच्या अंगणातून वरच्या मजल्यावर जात असलेल्या जिन्याच्या भिंतीवर साधारण अडीच मिटरच्या अंतरात दोन गोळीच्या आकाराची छिद्रे पडली असून हे छिद्र नेमकी गोळीबारातूनच झाली की, कशी या बाबत अद्याप साशंकता असून पोलिस घटनास्थळावर पाहणी करुन गोळीबाराबाबत पुरावे शेाधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांत तक्रार...

नलिनी तायडे यांनी याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आबा आणि अश्विन नामक व्यक्तीच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. घराबाहेर फटाक्यांसारखा आवाज येत होता आणि घराच्या जिन्यावर दोन छिद्रे पडलेली असल्याने कदाचित गोळीबार झाला असावा असा अंदाज तायडे यांनी व्यक्त केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

shootout affected Bike
जळगाव : प्रेयसीच्या नखऱ्यांसाठी प्रियकराने केली घरफोडी

गोळीबार झाला नाही...

घटनेची माहिती कळताच निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरात त्यांनी स्वतः चौकशी केली असता गोळीबार झाला नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच फिर्यादी यांना देखील निश्चितपणे गोळीबार झालाच आहे असे सांगता येणार नाही. अद्याप याप्रकरणी चौकशी सुरु असून काहीही ठोस माहिती हाती लागल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पेालिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com