अजिंठा लेणीची कवाडे तिसऱ्यांदा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajanta Caves Tourist places
अजिंठा लेणीची कवाडे तिसऱ्यांदा बंद

अजिंठा लेणीची कवाडे तिसऱ्यांदा बंद

वाकोद (ता. जामनेर) : ओमिक्रॉन (Omicron) व डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनुसार पर्यटनस्थळे (Tourist places) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोमवार (ता. १०)पासून जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणीची (Ajanta Caves) कवाडे पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांत सलग तिसऱ्यांदा अजिंठा लेणीची कवाडे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे लेणीत पर्यटनपूरक व्यवसाय करणाऱ्या जवळपास पाचशे कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

हेही वाचा: ‘...मृत्यूचे शिकार बनू नका’ असं म्हणणाऱ्याला मुंबई महापालिकेचे उत्तर

आतापर्यंत कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मागील दोन वर्षांत लेणीतील पर्यटन व्यावसायिकांची आर्थिक स्थिती अत्यंत रसातळाला गेलेली आहे. त्यातच ओमाक्रॉयन व डेल्टा व्हेरिएंटचा वाढता संसर्ग बघता राज्यातील पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे सोमवारपासून (ता. १०) लेणीची कवाडे पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आली आहे. परिणामी, अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या ७३ दुकानदार, ४५ डोलीवाहक, ३० रिक्षा व २० टॅक्सीचालक, १०० फेरीवाले, गाईड, १० पर्यटक निवासस्थाने, २० छोटेमोठे हॉटेल्सचालक व त्यामधील कामगार आणि इतर छोटेमोठे पर्यटनपूरक व्यवसाय करणारे कामगार अशा जवळपास पाचशे लोकांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

हेही वाचा: जळगावकरांची कोरोना चाचणीकडे पाठ; शहरात वाढताय सुपर स्प्रेडर

मागील लॉकडाउन काळात अत्यंत बिकट झालेली आर्थिक स्थिती नुकतीच रुळावर येत असताना व त्या काळातील कटू आठवणी अजूनही ताज्या असतानाच ओमायक्रॉन व डेल्टा संसर्गामुळे पुन्हा अजिंठा लेणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून अनिश्‍चित काळासाठी अजिंठा लेणी बंद राहणार असल्याची माहिती मिळताच येथील पर्यटन व्यावसायिक पूर्णपणे कोलमडून गेल्याचे दिसत असून, आम्ही व आमच्या मुलाबाळांनी जगायचे कसे? असा सवाल येथील पर्यटन व्यावसायिक विचारताना दिसत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top