Jalgaon Crime News : पातोंडा येथून 98 हजारांचे जनरेटर लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

Jalgaon Crime News : पातोंडा येथून 98 हजारांचे जनरेटर लंपास

अमळनेर (जि. जळगाव) : अमळनेर -चोपडा रस्त्यावरील पातोंडा गावात असणाऱ्या रिलायन्स कंपनीचा मोबाईल टॉवरजवळील ९८ हजार रुपयांचे जनरेटर व इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (generator other materials worth Rs 98 thousand were stolen jalgaon crime news)

पातोंडा येथे रिलायन्स कंपनीचा मोबाईल टॉवर असून, त्या ठिकाणी जुने जनरेटर काढून नवीन बसविण्यात आले होते.

त्या टॉवरवर टेक्निशियन नानाभाऊ विश्वास पाटील (रा.कायखेडे, ता.धुळे) हे २० जानेवारीस टॉवरच्या मेंटनन्ससाठी गेले असता त्यांना जनरेटर दिसून आले नाही.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सुमारे ९७ हजार रुपये किमतीचे परफेक्ट कंपणीचे ३० केव्हीए थ्री फेज जुने जनरेटर व १५०० रुपये किमतीचे लोखंडी स्टेबिलायझेर बॉक्स असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

दादाभाई सुरेश खलाने यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संदेश पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : तृणधान्यमुळे राहाल व्याधींपासून दूर; मान्यवरांनी सांगितले तृणधान्याचे महत्त्व