राव तिसऱ्यांदा अन्‌ भाऊ दुसऱ्यांदा मंत्रिपदी

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत.
Girish Mahajan and Gulab Raghunath Patil
Girish Mahajan and Gulab Raghunath Patilsakal
Updated on

जळगाव : पानटपरी चालविणारे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तिसऱ्यांदा मंत्री झाले, तर ज्यांना टपरीवरील आमदार म्हटले जायचे ते भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) दुसऱ्यांदा राज्याचे मंत्री झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर ते भाजपत सक्रिय झाले. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदापासून ते युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्यांनी भरारी घेतली. जामनेर तालुक्यात त्यांनी कार्यकर्त्यांची एक फळी जमविली होती. त्यातूनच पुढे ते सन १९९६ मध्ये प्रथम जामनेर विधानसभा मतदार संघातून पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले.

Girish Mahajan and Gulab Raghunath Patil
‘स्वराज्य’चा राजकीय पक्ष शक्य : संभाजीराजे

आपल्या कार्यकर्त्यांना ते चौकात, तसेच पानटपरी असे कुठेही सहज भेटत असत, आमदार झाल्यानंतर त्यांच चौकातच मित्र व कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड जमत असे. त्यामुळे त्यांना विरोधक टपरीवरचा आमदार असे म्हणत असे, परंतु महाजन यांना त्याचा राग आला नाही, उलट ते होय मी टपरीवरचा सर्वसामान्य जनतेला भेटणारा आमदार आहे. त्याचा मला गर्व आहे. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा व वैद्यकीय आरोग्य शिक्षण हे मंत्रिपद मिळाले तसेच ते जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले.

टपरीवाले गुलाबराव पाटील

पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करणारे गुलाबराव पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. कट्टर शिवसैनिक असलेल्या गुलाबरावांना बंडखोरीनंतर कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी या लहानश्‍या खेड्यात गुलाबराव पाटील यांनी राजकीय कारकीर्द बहरली. अगदी सर्वसामान्य घरातील असलेले गुलाबराव पाटील यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. चरितार्थासाठी त्यांनी पाळधी येथे पानटपरी सुरू केली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा ‘नसिब’ चित्रपट जोरात सुरू होता. त्यावरून त्यांनी आपल्या पानटपरीला ‘नसिब पान स्टॉल’ असे नाव दिले.

Girish Mahajan and Gulab Raghunath Patil
'नाळ’च जुळलेली नाही.. जळगावचे भले कसे होणार?

मात्र १९८६ च्या काळात शिवसेना मुंबईबाहेर पडून आपला राज्यातील ग्रामीण भागात आपला विस्तार वाढवीत होती. ग्रामीण भागातील अगदीच त्यावेळच्या भाषेत ‘टपोरी’ असलेली मुले शिवसेनेकडे वळली होती. मुंबईतील शिवसेनेच्या शिवसैनिकांचे ‘दे धडक’ कार्यक्रम ग्रामीण भागातील शिवसैनिकाला भूरळ पाडणारे ठरले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणाही त्यांना महत्वाची होती. त्यातूनच गुलाबराव पाटील हेसुध्दा शिवसेनेकडे वळले. नंतर ते पाळधीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि मग पुढे आमदार झाले. मात्र मंत्रिपदासाठी त्यांना २०१४ ची वाट पहावी लागली. ते प्रथम राज्याच्या युती सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळात त्यांना बढती मिळाली ते कॅबिनेट मंत्री झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com