Girish Mahajan Statement : खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची तपासाची गरज; आत्महत्या की खून?

Girish mahajan Statement about Eknath Khadse son Death
Girish mahajan Statement about Eknath Khadse son Deathesakal

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याचा तपास करण्याची आता गरज आहे, असे खळबळजनक विधान राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

जळगाव येथे आज नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर श्री. महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, की दूध संघात सुरू असलेल्या चौकशीत दररोज काहीतरी बाहेर येत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत. (Girish Mahajan Statement Need for investigation into Khadse son death Suicide or murder Jalgaon Political News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

Girish mahajan Statement about Eknath Khadse son Death
District Milk Union Jalgaon : अखाद्यचा गुंता सोडविण्यासाठी SIT स्थापन करावी

ते काहीही बोलायला लागले आहेत. ते मला चावट म्हणतात. परवा बोलताना ते म्हणाले, महाजन यांना मुलगा असता तर तोही आमदार आणि सूनही आमदार झाली असती. त्यांचे हे बोलणे चुकीचे आहे. मला दोन मुली आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मात्र खडसे यांना एक मुलगा होता, त्याचे काय झाले? त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हेसुद्धा तपास करण्याची आता गरज आहे. वास्तविक, मला हे बोलायचे नव्हते; परंतु मला आता ते बोलणे भाग पडले आहे.

त्यांच्या कर्तृत्वामुळे ईडी लागली

एकनाथ खडसेंच्या ईडी कारवाईबाबत बोलताना महाजन म्हणाले, की खडसेंच्या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर ईडी लागली. तुम्ही त्या भोसरीत काय काय केले, हे समोर येत आहे. आणखी लवकरच सर्व समोर येईल. आपले जावई सतरा महिने झाले कारागृहात आहेत, त्यांचा जामीन तुम्ही का करीत नाही? तुम्ही मला मोक्का लावला, हे सांगायची गरज नाही. तुमचे षडयंत्र पेनड्राइव्हमध्ये आलेले आहे. वकील प्रवीण चव्हाणपासून डीसीपीपासून सर्वांचे षडयंत्र त्या पेनड्राइव्हमध्ये ‘आखो देखा हाल है’, तुम्ही मला मोक्कात टाकल याची चौकशी होत आहे. तुमच्यावर ईडी चौकशी सुरू आहे. चौकशीतून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’, स्पष्ट होईल.

Girish mahajan Statement about Eknath Khadse son Death
Jalgaon Crime News : मुलींना इशारे करणाऱ्याला दिला चोप; नारळपाणी विक्रेत्याला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com