Jalgaon : गीता धर्मग्रंथ नव्हे, मानवी जीवनाचे नियमन करणारा ग्रंथ

Dr. Shankar Abhyankar
Dr. Shankar Abhyankaresakal

जळगाव : गीता हा धर्मग्रंथ नसून मानवी जीवनमूल्ये रुजविणारा, मानवी वर्तनाचे नियमन करणारा ग्रंथ आहे. त्यात कोणत्याही प्रकारे पूजाविधी, कर्मकांडाचा उल्लेख नाही. त्यामुळे गीतेला धर्मग्रंथ म्हणणे अयोग्य आहे. शिवाय विश्‍वकल्याणाची शिकवण देणाऱ्या एकमेव अशा या ग्रंथावर ते अन्याय करणारे ठरेल, असे स्पष्ट मत विख्यात प्रवचनकार डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

केशव स्मृती प्रतिष्ठान व जळगाव जनता सहकारी बँकेच्या व्याख्यानमालेसाठी श्री. अभ्यंकर जळगावात आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या अभ्यासाचा व प्रवचनाचा विषय असलेल्या श्रीमद्‌भगवत गीतेवर संवाद साधला असता, त्यांनी ‘सकाळ’शी दिलखुलास चर्चा केली.(Gita is not a scripture but a book Regulates human life Dr. Shankar Abhyankar It includes philosophy of protection of life values universal welfare Jalgaon News)

Dr. Shankar Abhyankar
Jalgaon : नगररचनाच्या अभियंत्याने बांधकाम मंजुरीसाठी घेतले अडीच लाख

प्रश्‍न : गीतेला धर्मग्रंथ म्हणावे, समजावे का?

डॉ. अभ्यंकर : अजिबात नाही. गीतेत कर्मकांड, पूजाविधी याबद्दल काहीही सांगितलेले नाही किंवा त्याचा साधा उल्लेखही नाही. मग हा धर्मग्रंथ कसा असू शकेल? गीता मानवी मूल्यांची, सद्‌गुणांची शिकवण देणारा, मानवी वर्तन कसे असले पाहिजे याचे नियमन करणारा, सदाचरणाचा संदेश देणारा ग्रंथ आहे.

प्रश्‍न : अन्य धर्मग्रंथ आणि गीतेत नेमका काय फरक आहे?

डॉ. अभ्यंकर : गीतेतील तत्त्वज्ञान, त्यातील उपदेश केवळ हिंदूंसाठी नव्हे, तर समस्त मानवजातीसाठी आहेत. अन्य कुठल्याही ग्रंथात मांडलेली नाही, अशी विश्‍वकल्याणाची संकल्पना गीतेत आहे. विश्‍वाला आलिंगन देण्याचे तत्त्वज्ञान त्यात आहे. आपण आपल्या इतिहासात स्वतःहून कधीही, कुठल्याही राष्ट्रावर आक्रमण केलेले नाही.

‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु

सर्वे सन्तु निरामयाः’

हीच गीतेची शिकवण आहे आणि तेच आपले आचरणही.

प्रश्‍न : गीतेतील उल्लेखानुसार फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे कसे शक्य आहे?

डॉ. अभ्यंकर : गीतेतील हा उपदेश चुकीच्या अर्थाने घेतला जातो. काम करीत राहायचे आणि त्याचा मोबदला मागायचा नाही, असा त्याचा मुळीच अर्थ नाही.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

त्याचा अर्थच मुळात असा, की आपल्या हातात केवळ कर्म करणे आहे, त्याच्या फळाची अपेक्षा करू नये. आपण सर्व कर्मयोगीच आहोत. ज्या ठिकाणी काम करतो, सेवा बजावतो ते आपले कर्म. त्याचे वेतन आपल्याला मिळते, त्यावर आपला हक्क आहेच, पण त्याप्रति आसक्ती ठेवून आपल्याला कर्म करायचे नाही.

म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान।

ते निर्दोष हो आवें॥

असे ज्ञानेश्‍वर माऊलींनी ज्ञानेश्‍वरीत सांगून ठेवलेय. अर्थात, कर्म हे डोळे असेल, तर ज्ञान दृष्टी आहे. त्या दृष्टीने परिणाम बघून चांगल्या कर्माचे आचरण करणे, असे त्यात अभिप्रेत आहे. अशा मानवी जीवनाशी निगडित सर्वच कर्म, कर्तव्य आणि धर्म पालनाची व त्यातून मानवी जीवनाच्या कल्याणाची शिकवण गीतेत आहे, म्हणूनच ज्ञानेश्‍वरांनीही विश्‍लेषणासाठी गीतेचीच निवड केली.

साचची बोलाचे नव्हे शास्त्र

संसार जीणते हे शस्त्र, अशा शब्दांत माऊलींनी गीतेचा सार मांडलांय.

Dr. Shankar Abhyankar
Jalgaon : सत्तांतरानंतर DPDCची सोमवारी पहिलीच सभा; 25 टक्के निधी अद्यापही अखर्चित

गीतेत हिंसा नव्हे, धर्मयुद्धाची शिकवण

माजी केंदीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला ‘जिहाद’ची शिकवण दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याकडे लक्ष वेधले असता, डॉ. अभ्यंकर म्हणाले, की मुळात युद्ध ही दोन प्रकारची. एक वृत्तीफलक अन्‌ दुसरे धर्मफलक. भारतावर जी आक्रमणे झालीत, युद्धे झालीत ती सर्व भूमी, सर्व प्रकारची साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी झालीत. वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट करणे, ब्रिटनच्या मेट्रोतील स्फोट, भारतातील दहशतवादी हल्ले हा जिहाद आहे. जिहादी कारवायांसह विविध कारणांसाठी जगभरात जे काही सुरू आहे ती सर्व वृत्तीफलक हिंसा. रामायण, महाभारतातील युद्ध मात्र धर्मफलक आहे. कारण, ते धर्माच्या, सज्जन- सद्‌गुणांच्या, जीवनमूल्यांच्या रक्षणार्थ झाली, म्हणून महाभारतातील युद्ध द्रौपदीवरील अत्याचाराविरुद्ध न्यायाची बाजू घेणारे होते. रामायणातही रावणाने सीतेचे अपहरण केल्याने रावणाचा अहंकार मोडून काढण्यासाठी युद्ध झाले. उलटपक्षी लंकेवर विजय मिळवूनही प्रभू रामचंद्रांनी ती भूमी ताब्यात न घेता विभीषणाला देऊन टाकली. त्यामुळे गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश व जिहाद याचा संबंध जोडणे चुकीचेच आहे, अशी स्पष्ट भूमिकाही डॉ. अभ्यंकरांनी मांडली.

Dr. Shankar Abhyankar
Jalgaon : सिंचनासाठी ‘गिरणा’ तून मिळणार 5 आवर्तने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com