सराफा व्यापार्‍यांना गंडा घालणाऱ्याला अटक

arrest
arrestesakal
Updated on

जळगाव : पंधरा वर्षांपासून सोन्या-चांदीचे दागिने तयार करणारा कारागीर दोन व्यापाऱ्यांची फसवणूक करून फरारी झाला होता. बापन मंटू कारक (वय 28,रा. पश्चिम बंगाल, ह.मु. मारुती पेठ, जळगाव) असे संशयिताचे नाव असून, शनिपेठ पोलिसांनी पंजाबमधील भटिंडा येथून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयितास न्यायालयात हजर केले असता, त्याला गुरुवार पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

शहरातील मारुती पेठेतील सुशांत तारकनाथ भुतका (वय ४२) यांचा ते राहत असलेल्या परिसरात सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक 15 वर्षांपासून सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे काम करीत होता. यादरम्यान त्याने विश्वास संपादन करून घर बांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले. त्याने दीपक संघवी यांच्याकडूनही 3 लाख 14 हजार रुपये दागिने बनविण्यासाठी घेतले होते.

arrest
साधूचा वेश परिधान करून महिलांची मंगळसूत्र चोरणारे दोन जण जाळ्यात

एके दिवशी बापन कारक दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला, मात्र आढळून आला नाही, तसेच त्याच्याशी संपर्कही केला. मात्र, संपर्कही झाला नाही. सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले दोन लाख ६० हजार रुपये व दीपक संघवी यांचे तीन लाख १४ हजार रुपयांचे दागिने परत न करता दोघा व्यापाऱ्यांची एकूण पाच लाख ७४ हजार रुपयांची बापन कारक याने फसवणूक केली होती. या प्रकरणी दोन महिन्यांनंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

कारखान्यातून घेतले ताब्यात

फरारी संशयित बापन कारक पंजाबमधील भटिंडा येथे असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांना मिळाली. ते रवींद्र बोदवडे, अमोल विसपुते व राहुल घेटे यांचे पथक घेऊन पंजाबला रवाना झाले. या पथकाने त्या ठिकाणावरील सोने-चांदी बनविणाऱ्या मोठ्या कारखान्याच्या इमारतीतून बापन याच्या मुसक्या आवळल्या.

arrest
एक कोटीची हाव; विम्याच्या पैशांसाठी पत्नीनेच केली पतीची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com