crime
crimeesakal

एक कोटीची हाव; विम्याच्या पैशांसाठी पत्नीनेच केली पतीची हत्या

पतीचा मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव करण्यात आला होता.
Published on

बीडमधली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत यासाठी पत्नीचे पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अपघातात पती गेल्याचा बनाव करत त्याचा खून करण्यात आला. (Wife killed her husband )

crime
लग्न करण्यास गळी पडत असल्याने मेहुणीचा खून

बीडमध्ये ही घटना घडली आहे. अहमदनगर महामार्गावरच्या बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळला. यात दुचाकीला एका वाहनाने धडक दिल्याचं दिसत होतं. या व्यक्तीच्या पत्नीला मात्र पतीच्या मृत्यूबद्दल काहीच दु:ख वाटत नव्हतं. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जरा खोलात जाऊन तपास केला. त्यानंतर लक्षात आलं की या मृत इसमाच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते. (Latest Crime news)

crime
मिरज : लंगरपेठच्या तरुणाचा गुंडेवाडी येथे खून

त्यानंतर टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली आणि अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. आणि मृतदेहाला रस्त्यावर फेकण्यात आलं होतं. तपासाअंती खुलासा झाला की पत्नीनेच पतीचा एक कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी सुपारी देऊन त्याचा खून केला होता. तिने पतीच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना दहा लाखांची सुपारीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com