
जळगाव : गतवर्ष सर्वच व्यवसायासाठी उत्कर्ष करणारे ठरले. २०२२ मध्ये निर्बंधमुक्त वातावरणामुळे सोने-चांदीची विक्रमी विक्री झाली. २०२२ मधील सोने-चांदीच्या दराचा विचार केल्यास जानेवारी २०२२ मध्ये सोन्याचे दर ४८ हजार ५०० (प्रतितोळा, जीएसटीविना) होते.
डिसेंबरअखेर सोने ५५ हजार ३०० वर पोचले, तर चांदीचे दर ६३ हजार (प्रतिकिलो) होते. ते आता ६९ हजारांवर पोचले आहेत. वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल सात हजारांची वाढ, तर चांदीच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे. आगामी काळातही सोने-चांदी वाढणार असल्याचे संकेत आहेत. (Gold Rate Increased from 48 thousand to 55 thousand in a year Jalgaon News)
२०२१ मध्ये वर्षभर सोन्याचा दर ५१ हजारांवरून ४८ हजार ५०० वर आला होता. वर्षभरात दीड ते दोन हजारांची घट सोन्याच्या दरात झाली. चांदीच्या दरातही आठ ते दहा हजारांनी घट झाली. २०२२ मध्ये गणेशोत्सवापासून कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामुळे सर्वच व्यवसायांना उभारीचे पंख फुटले होते.
नंतर आलेला दसरा, दिवाळी, पाडवा, भाऊबीज या सणांना तर सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांना ‘वेटिंग’ करावी लागल्याचे चित्र होते. एवढा उत्साह सोने खरेदीसाठी होता. जानेवारी २०२२ मध्ये सोन्याचा दर ४८ हजार ५०० होता, तर चांदीचा दर ६३ हजार होता.
मार्चमध्ये दरात अचानक वाढ झाली. सोने ५० हजार ८०० वर पोचले, तर चांदी ६७ हजारांवर पोचली. एप्रिलमध्ये चांदी ६९ हजारांवर पोचली.
जूनमध्ये सोने ५१ हजारांवर गेले. चांदीच्या दरात मात्र पाच हजारांची घसरण होऊन ६२ हजार ५०० वर आले. सप्टेंबरमध्ये सोन्याचे दर ५० हजार ४०० पर्यंत खाली आले. तर चांदीतही घसरण होऊन ती ५४ हजारांपर्यंत खाली आली.
दिवाळीपासून वाढ सुरू
ऑक्टोबरमध्ये सोने ५१ हजार ८००, तर चांदी ६२ हजारांवर पोचली होती. दिवाळीत ५२ हजार चांदी होती. चांदीचे दर घसरून ते ५९ हजारांवर आले होते. दर स्थिर होते. नंतर मात्र दरात वाढ सुरू झाली. नोव्हेंबरमध्ये सोन्याचे दर ५१, तर ५३ हजारांच्या दरम्यान राहिले.
तर चांदी ६१ हजारांवरून वाढत जाऊन ६६ हजार ८०० पर्यंत आली. डिसेंबरमध्ये सोने ५४ हजारांपासून वाढत सध्या ५५ हजार ३०० वर पोचले आहे. तर चांदी ६८ हजारांवरून ६९ हजारांवर आली आहे. सोने-चांदीच्या या दरवाढीला लग्नसराई, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरात आलेली तेजी कारणीभूत ठरली.
सप्टेंबरमध्ये खरेदी केलेल्यांना मोठा नफा
सप्टेंबर २०२२ मध्ये सोने ५० हजार ४०० होते, तर चांदी ५४ हजार प्रतिकिलो होती. ज्यांनी गुंतवणूक म्हणून ही खरेदी केली असेल, त्यांनी आता विक्रीस काढली तर सोन्यामध्ये त्यांना चार हजार ९०० रुपयांचा नफा, तर चांदीत १५ हजारांचा नफा अवघ्या चार महिन्यांत मिळेल. एवढा नफा कोणतीही बंक देऊ शकत नाही. यामुळेच सोने-चांदीकडे गुंतवणूक म्हणून पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सोन्याचे वर्षभरातील महिनाअखेरचे दर असे
तारीख - सोने (प्रतितोळे) -- चांदी (प्रतिकिलो)
जानेवारी २०२२ -- ४८ हजार ५०० -- ६३ हजार
फेब्रुवारी-- ५१ हजार २००-- ६७ हजार
मार्च-- ५१ हजार ८०० -- ७० हजार
एप्रिल- ५२ हजार -६७ हजार
मे- ५१ हजार ७०० -- ६३ हजार
जून--५१ हजार २०० -- ६२ हजार ५००
जुलै-- ५१ हजार ९०० -- ६० हजार
आगस्ट-- ५१ हजार ५०० -- ५६ हजार
सप्टेंबर---- ५० हजार ४००-- ५४ हजार
ऑक्टोबर-- ५० हजार ६०० -- ५९ हजार
नोव्हेंबर--५२ हजार ८००--६३ हजार
डिसेंबर--५५ हजार ३००--६९ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.