Latest Marathi News | थंडी वाढल्याने गहू, हरभरासाठी पोषक वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wheat Crop

Nashik News : थंडी वाढल्याने गहू, हरभरासाठी पोषक वातावरण

नरकोळ : थंडीचा जोर वाढत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरासह लागवड झालेल्या कांदा पिकाला ही वाढती थंडी पोषक ठरत आहे. गेल्या पंधरवड्यात थंडीचा जोर ओसरला होता. त्यामुळे पिके कोवीळवाणी दिसत होते.

बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा पिकाला बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फवारणी करावी लागली होती. परंतु थंडीचा जोर वाढत असल्याने आता पिके जोमदार दिसत आहे. गत वर्षापेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. (Nutrient environment for wheat gram crop is cold weather increases Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच

कांद्याच्या चढ उतार भावामुळे गव्हाकडे शेतकरी वळला आहे. कोरडवाहू शेतीतील हरभरा ज्वारी हे पिके वाढत्या थंडीमुळे चांगले आहेत. रात्री व पहाटे प्रचंड प्रमाणात गारवा राहत आहे. गहू पिकाला उत्पादक युरिया हे रासायनिक खते देत आहेत.

तर नुकताच लागवड झालेल्या कांदा पिकाला तणनाशक फवारणी शेतकरी करीत आहेत. रब्बी हंगामातील पिकांना वाढणारी थंडी पोषक असून पिके दमदार आहेत. कांद्याच्या चढउतार भावामुळे आता गव्हाकडे शेतकरी वळला असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी गणेश चौरे यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News : गतवर्षात नाशिककरांनी अनुभवला 3 पोलिस आयुक्तांचा कारभार