Latest Marathi News | सराफा व्यापाऱ्यास मारहाण; लूट करणाऱ्या एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon : सराफा व्यापाऱ्यास मारहाण; लूट करणाऱ्या एकाला अटक

जळगाव : शहरातील ऑडिटर कॉलनीत व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड तसेच हातातील अंगठी असा ३ हजार ५७० रुपयांचा ऐवज हिसकावून नेला होता. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. नीतेश मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा मढी चौक) असे संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील मुक्ताई पार्क परिसरात सुरेंद्रकुमार शंकरलाल राका (वय ५२) हे वास्तव्यास आहेत. ऑडिटर कॉलनीत सुरज ज्वेलर्स येथे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेंद्रकुमार राका यांना एकाने मारहाण करून त्यांच्याजवळील २ हजार ५७० हजार रुपयांची रोकड तसेच १ हजार रुपयांची नवग्रहाची अंगठी जबरीने चोरुन पसार झाला.

हेही वाचा: Jalgaon : भर पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

घटनेनंतर सुरेंद्र कुमार राका यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या संशयित नीतेश मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा मढी चौक) यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव महापालिका वार्तापत्र : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का... नही रे भो, नही रे भो!

Web Title: Gold Trader Beaten Up One Of The Robbers Was Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..