Crime Update : शेतकऱ्याच्या घरातून 70 हजारांचा ऐवज लंपास | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

Crime Update : शेतकऱ्याच्या घरातून 70 हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगाव : येथील शेतकऱ्याच्या घराचा कडी-कोयंडा तोडून लोखंडी पेटीत ठेवलेली रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शहरातील धुळे रोडवरील बायपास परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (goods of 70 thousand was stolen from farmer house Jalgaon Crime Update Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : ATM फोडण्याचा पांगरी येथे प्रयत्न

गोरख अमरसिंग चव्हाण (वय ३८, रा. बायपास, धुळे रोड, चाळीसगाव) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान गुरुवारी (ता. ११) पहाटे चव्हाण कुटुंब पहाटेच्या सुमारास गोरख चव्हाण यांना घरातील भांडे वाजत असल्याचा आवाज आला.

त्यानंतर त्यांनी अंथरुणावरून उठून बघितले असता दोन जण घरात ठेवलेली लोखंडी पेटी चाचपडत असताना आढळून आले. गोरखने घरात आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. त्यानंतर त्यांनी लोखंडी पेटीची पाहणी केली असता त्यात ठेवलेले ४५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ५ हजार रुपये किंमतीचे १० भार चांदीचे ब्रेसलेट व २० हजार रुपये रोख असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा उघडकीला आला. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे.

हेही वाचा: खासगी संभाषणात संयम गमावू नका; Social Mediaवरील ‘व्यवहार’ होतोय रेकॉर्ड

Web Title: Goods Of 70 Thousand Was Stolen From Farmer House Jalgaon Crime Update Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..