ग्रामपंचायत निवडणूक : चोपडा तालुक्यात ७०९ उमेदवार रिंगणात 

सुनील पाटील  
Tuesday, 5 January 2021

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नऊ गावे बिनविरोध झाली असल्याने ४३ गावांमध्ये निवडणूक होणार आहे.

चोपडा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ४) तीनपर्यंत माघारीच्या दिवशी ४१५ उमेदवारांनी माघार घेतली असून, तालुक्यात ४८२ जागांसाठी ७०९ उमेदवार रिंगणात असल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत रस्सीखेच होणार असल्याचे दिसून येत आहे. 

आवश्य वाचा- शोधून शोधून थकली..व्याकूळ होवून बसली; अचानक ‘आऽऽई’ हा शब्द कानावर आला आणि सारेच निशब्द! 

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नऊ गावे बिनविरोध झाली असल्याने ४३ गावांमध्ये निवडणूक होणार आहे. बिनविरोध झालेल्या गावांमध्ये मजरेहोळ, धनवाडी, भवाळे, कुरवेल, गलंगी, माचले, चांदसणी, हिंगोणे, मामलदे ही गावे बिनविरोध झाली आहेत. 

यात चहार्डी गावात अर्जुन देवराम कोळी हे बिनविरोध झालेत तर वढोदा येथे प्रभाग तीनमध्ये महिला राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज न भरता ‘सर्वसाधारण’मध्ये दाखल केल्याने सेनेच्या केशरबाई लोटू पाटील या बिनविरोध झाल्या. 

आवर्जून वाचा- अधिकाऱ्यांचा घोळ : शासकीय कामासाठी वाळू उपलब्धतेचे त्रांगडे 
 

ग्रामपंचायत हिंगोणे बिनविरोध 
हिंगोणे (ता चोपडा) येथील दरवेळेस अतिशय चुरशीची होणारी ग्रामपंचायत निवडणूक यावेळेस पहिल्यांदाच सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामस्थानी एकमताने बिनविरोध केली. या वेळी सुधाकर पाटील, अंजनाबाई पाटील, संगीता पाटील, अशोक हिवराये, भाग्यश्री पाटील, तुकाराम बाविस्कर, कलुबाई भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सुधाकर पाटील यांनी समस्त गावकऱ्यांचे आभार मानले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news chopda candidate contest