निवडणूकीबाबत एका गावाचा आहे विक्रम ! कोणता जाणायचायं तर मग वाचा  

आल्हाद जोशी
Thursday, 31 December 2020

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केली जाते.निवडणूक बिनविरोध होते.

एरंडोल : ग्रामपंचायत निवडणुकीत एरंडोल तालुक्यातील एका गावाचा अनोखा विक्रम केला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून ग्रामपंचायतसह विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.

आवश्य वाचा- सरत्या वर्षात केवळ एकनाथ खडसे विरुध्द भाजप; आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुराळा ! 

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.आमदार चिमणराव पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये विकासनिधीच्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले होते. तालुक्यातील धारागीर,सोनबर्डी व हनुमंतखेडे या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या धारागीर गावात 1970 पासून म्हणजे सुमारे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केली जात आहे.

प्रत्येक समाजाला संधी

पन्नास वर्षापासून गावातील प्रत्येक निवडणूक बिनविरोध करून धारागीर ग्रामस्थांनी राज्यात आदर्श निर्माण केला आहे.धारागीर गावातील ग्रामस्थ प्रत्येक निवडणूक माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करीत आहेत.धारागीर गावात राजपूत,मराठा,दलित,अदिवासी समाजाचे नागरिक राहत असून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.गावात कोणताही वाद झाल्यास ग्रामस्थ एकत्र बसुन वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असतात.प्रत्येक निवडणुकीत ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करून उमेदवार निच्छित करीत असतात.

वाचा-  घरात पिठ नाही म्हणून चोरले गव्हाचे पेाते; वायरी जाळतांना ते सापडले आणि समोर आल्या घटना -

गावाचे पूनर्वसन 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देखील सर्व मतदार माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतदान करीत असतात.तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अनजानी प्रकल्पात जुने धारागीर बुडीत झाले असून राष्ट्रीय महामार्गावर नवीन गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.गावातील लोकसंख्येपेक्षा जास्त झाडांची लागवड करून त्यांचे ग्रामस्थांनी संगोपन करून वृक्षारोपणाचा आदर्श निर्माण केला आहे.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी लढवलेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थ खंबीरपणे त्यांच्याबरोबर राहिले असल्याचा इतिहास आहे.बिनविरोध निवड झालेले सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात.

पन्नास वर्षाची परंपरा

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध केली जाते.निवडणूक बिनविरोध होत असल्यामुळे गावात कोणतेही राजकीय वाद होत नाहीत.सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न पन्नास वर्षात करण्यात आला आहे.निवडणूक बिनविरोध होत असल्यामुळे गावाचा विकास होत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news erandol jalgaon Unopposed selection tradition gram panchayat record