
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवहणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती.
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघात ग्रापंचायत निवडणूकीचा गढ कायम राखण्यात पून्हा यशस्वी झाले आहे. जामनेर तालुक्यातील ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. त्या पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरीत ६८ ग्रामपंचायतीत निवडणूका झाल्या.
निवडणूकीपुर्वी घडामोडी
जळगाव जिल्हयातील भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानतंर त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता, त्यांच्यावर शाब्दीक हल्ला केला, त्यात ‘बीएचआर’पंतसंस्थेचा घोटाळा बाहेर आला. त्याबाबत गिरीश महाजन यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. तसेच मविप्र संस्थेतील संचालक वाद प्रकरणातही गिरीश महाजन यांचे नाव आले, त्यांच्यावर थेट मारहाणीचा गुन्हा पुणे येथे दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी लढवली शक्कल; सतर्क पोलिसदादाला कळताच, पुढे घडले असे !
गड राखण्यात महाजन यशस्वी
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवहणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष होते. गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत.
आवर्जून वाचा- तृतीयपंथीची विजयी कथा; अर्ज ठरविला होता बाद, पण न्यायालयालचा दिलासा आणि 'अंजली' लढली
महाजनांची पकड कायम
तालुक्यातल ६८ ग्रामपचायतीपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल ४५ जागावर विजय विजय मिळविला आहे. उर्वरीत जागावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, व शिवसेनेने विजय मिळविला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची जामनेर तालुक्यात अद्यापही पकड कायम असल्याचे दिसून आले आहे.
नेरी,वाकोद ग्रामपंचायत गमावली
तालुक्यात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाकाली भाजपने यश मिळविले असले तरी नेरी (बुद्रूक) आणि वाकोद या महत्वाच्या दोन ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी झाले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे