
अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत.
जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात आज अखेर एकूण १ हजार २१३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कालपर्यंत जिल्हयात केवळ ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज भरण्यास सर्वच तहसिल कार्यालयात गर्दी झाली होती. यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला होता.
आवश्य वाचा- पोलिसांचा संशय ठरला खरा; 'त्या' तरुणाचा अनैतिक संबंधातून खून
जळगाव तालुक्यात आजअखेर १६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. अनेक ग्रामपंचायतीसाठी अद्यापही एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे आगामी दोन दिवस अर्ज भरणाऱ्यांसाठी भाउगर्दीचे असतील.
ग्रामीण भागात निवडणुकींचा रंग चढणार
ग्रामीण भागात दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चढत आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहे. आमदारांनी त्या-त्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी अद्याप कोणताही प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक पॅनलचे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही.
आवर्जून वाचा- गव्हातील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; कोणता ? वाचा सविस्तर !
तीनच दिवस अर्ज भरण्यास शिल्लक आहेत
आतापर्यत झालेले तालुकानिहाय दाखल अर्ज
जळगाव १६०, जामनेर १५४, धरणगाव ५३, एरंडोल ३९, पारोळा ४२, भुसावळ ४३, मुक्ताईनगर २४, बोदवड ७०, यावल ७४, रावेर ११२, अमळनेर ६३, चोपडा ११३, पाचोरा १०३, भडगाव ५१, चाळीसगाव ११२ .
निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करणे ः २३ ते ३० डिसेंबर
छाननी ः ३१ डिसेंबर
अर्ज माघारी, चिन्हवाटप ः ४ जानेवारी २०२१
मतदान ः १५ जानेवारी
संपादन- भूषण श्रीखंडे