Latest Marathi News | चाळीसगावला झालेल्या चोरीत नातजावई निघाला मास्टरमाईंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : चाळीसगावला झालेल्या चोरीत नातजावई निघाला Mastermind

चाळीसगाव : येथील नेताजी चौकात मागील गुरुवारी (ता. १५) वृद्ध महिलेच्या घरात भरदिवसा सात लाखांची रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या चोरीचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास लावला.

वृद्धेचा नातजावई या चोरीचा मास्टरमाईंड असल्याचे तपास निष्पन्न झाले. त्याने आपली पत्नी व तिच्या मैत्रिणींच्या मदतीने आजेसासूच्या घरातून रोकड लंपास केली. चौघांना येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Grandson in law is criminal the theft in Chalisgaon you tube journalist and three women arrested jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon News : शहरालगत नव्या MIDCचा प्रस्ताव

शहरातील नेताजी चौकात सुशीलाबाई अमृत गोसावी (वय ७३) त्यांच्या नातीसह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी सुनीता गोसावी (मालेगाव) हिच्या घराच्या बांधकामासाठी दुसरी मुलगी प्रतिमा बुवा (धुळे) हिच्याकडून सात लाख रुपये आणले होते. गुरुवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास सुशीलाबाई मसाला घेण्यासाठी बाहेर गेल्या असता, त्यादरम्यान त्यांच्या घरातून ते पैसे कोणी तरी चोरून नेले.

या चोरीची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर तोंडाला स्कार्प बांधलेल्या दोन महिला त्यांच्या घरी आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात एका महिलेने पिवळ्या रंगाचा फूल भायांचा टॉप व काळी जीन्स, दुसऱ्या महिल्याने काळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची बॅगही असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरीचा तपास सुरू केला.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jalgaon News : Happy Christmas ; ख्रिश्‍चन बांधवातर्फे नाताळ उत्साहात साजरा

शनिवारी (ता. २४) पोलिसांनी नाशिकहून मुख्य संशयित रवींद्र गोसावी (वय ३१) याला ताब्यात घेतले. या चोरीत त्याच्यासोबत तीन महिलांनाही अटक करण्यात आली. मुख्य संशयित रवींद्र गोसावी हा फिर्यादी सुशीलाबाई यांचा नातजावई आहे.

या चोरीमध्ये महिला कॉन्स्टेबलसह यूट्यूब महिला पत्रकारही सहभागी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून रोख पाच लाख ९७ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांचे सहकारी राहुल सोनवणे, विनोद खैरनार, अमोल भोसले, महिला पोलिस शबा शेख तपास करीत आहेत.

हेही वाचा: Mahad News : मनुस्मृती दहन दिनानिमित्त हजारो भीमसैनिकांची गर्दी; महिलांची रॅली