कोरोनामुळे नोंदणी विवाहाची वाढतेय क्रेझ | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : कोरोनामुळे नोंदणी विवाहाची वाढतेय क्रेझ

जळगाव : कोरोनामुळे नोंदणी विवाहाची वाढतेय क्रेझ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनोच्या निर्बंधामुळे गतवर्षापासून विवाह नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा जानेवारी ते आजअखेरपर्यंत तब्बल ३९३ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले आहे. यावरून नोंदणी विवाहाचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. वेळेची, पैशांची बचतही यानिमित्ताने होत आहे. विवाह नोंदणी पद्धतीने करून पाहुण्यांना पाहुणचार करण्यावर भर दिला जात आहे. अकरा महिन्यांतील विवाह नोंदणीचे प्रमाण पाहता नोंदणी विवाहांची क्रेझ वाढल्याचे दिसून येते.

कोरोनोच्या दोन वर्षांच्या काळाने अनेक बदल घडून आले आहेत. विवाहाच्या बाबतीतही लोकांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून येत आहे. नागरिक आता जाणीवपूर्वक नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.

हेही वाचा: अकोला : कोरोना लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

विवाह नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद्‍भवण्याची शक्यता गृहित धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जाते. तशीच उदाहरणे यापूर्वी दिसून आली आहेत. पंरतु कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाच्या काळात नोंदणी पद्धतीच्या विवाहविषयीची जनजागृती वाढली आहे. खर्चापेक्षाही कायदेशीर विवाहदेखील महत्त्वाचा असल्याचा विचारही रूजला असल्याचे दिसून येते.

कुटुंबीयांकडून विरोध असेल तर नोंदणी विवाह केला जातो हा प्रकार आता बाजूला पडू पाहात आहे. आता स्वच्छेने नोंदणी विवाहासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. वधूवरांकडील लोक आपल्या मुला-मुलीना नोंदणीसाठी आणत असल्याचे या काळात घडून आले. कोरोना निर्बधाच्या काळात झालेल्या विवाहाची संख्या पाहता जुळविलेले विवाह नोंदणी पध्दतीने करण्यात आले आहे. आंतरजातीय विवाह असल्यास पोलिस सरंक्षण दिले जाते. शिवाय शासनाकडून आर्थिक मदतही मिळते.

नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अकरा महिन्यांत ४९४ जणांनी विवाह नोंदणीसाठी अर्ज केले होते. त्यातील ३९३ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. १०१ विवाह बाकी आहेत. केवळ २५० रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह होतो. यामुळे वेळेची, पैशांची मोठी बचत होते. विवाहेच्छुनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पुढे यावे.

-संजय ठाकरे, विवाह नोंदणी अधिकारी

loading image
go to top