Dharangaon- Erandol Bazar Committee: धरणगावात पालकमंत्र्यांनी राखला गड! सहकारला 12; महाविकास आघाडीला 6 जागा

election news
election news esakal

Dharangaon- Erandol Bazar Committee : येथील बाजार समितीच्या चुरशीच्या लढतीत भाजप, शिंदे गट, संजय पवार राष्ट्रवादी यांच्या सहकार पॅनलला १२ तर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीला ६ जागा मिळाल्या आहेत.

सोसायटी मतदार संघाचे जनरल सहा जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. येथे ‘सहकार’ला ४ तर शेतकरी विकास पॅनलला ३ जागा मिळाल्या. यात शेतकरी विकास पॅनलचे सुरेश चौधरी यांना सर्वाधिक ५५५ मते मिळाली. (Guardian Minister maintained stronghold in Dharangaon 12 to sahakar Mahavikas Aghadi 6 seats in Dharangaon Erandol Bazar Committee election jalgaon)

या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपचे पी. सी. पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय महाजन, चंदन पाटील यांनी तर शेतकरी विकास पॅनलसाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधारी, सेनेचे गुलाबराव वाघ, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन आदी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

महिला राखीव गटासाठी रमेश पाटील, नीलेश चौधरी यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती मागणी फेटाळली. निकाल घोषित झाल्यावर ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजप शिंदे गटाने मंत्री पाटील यांना खांद्यावर घेऊन आनंद व्यक्त केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

election news
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी

विजयी उमेदवार, मिळालेली मते.

सोसायटी मतदार संघ : सुनील पवार ५३२, सुदाम पाटील ५१७, जिजाबराव पाटील ५१५, किरण पाटील ५०६, सुरेश चौधरी ५५५, रघुनाथ पाटील ५०७, रंगराव पाटील ५०३, महिला राखीव : लताबाई पाटील ५१९, रेखाबाई पाटील ४९७. ओबीसी : रमेश पाटील ६२८,

एन टी. : दिलीपराव धनगर ५७७. ग्रामपंचायत सर्वसाधारण : सुरेखा चौधरी ४८५, रवींद्र पाटील ४४१. एससी : संजय पवार ५०३. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : प्रेमराज पाटील ४९०, व्यापारी मतदार संघ : नितीन कर्वा १५३, संजय काबरे १४४. हमाल मापाडी मतदार संघ. ज्ञानेश्वर माळी १९९.

election news
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com