Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal

Gulabrao Patil News : उर्वरित केळी विमा क्षेत्राची तत्काळ पडताळणी करा : पालकमंत्री पाटील

Gulabrao Patil News : धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी १५ दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात यावी.

तसेच, जिल्ह्यात केळीचा पिक विमा काढलेल्या उर्वरीत ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणीही ऑगस्ट संपण्यापूर्वी करण्यात यावी. असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता. १४) येथे दिले. (Guardian Minister Patil orders to Immediately verify rest of banana insurance sector jalgaon news)

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील या प्रकल्पांच्या प्रस्तावांची सद्यस्थिती, प्रलंबित घरकुलांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजयनगर, नेहरूनगर व गौतमनगर येथील १७५४ अतिक्रमित घरांचा प्रश्‍न शासन निर्णयानुसार लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा.

नशिराबाद येथील गट नंबर २३२०मधील अपूर्ण बांधकाम असलेली घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्‍न, तसेच कुसुंबा येथील गट नंबर २३०/२ व ३१५ मधील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापैकी ४४ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil
Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

अद्याप ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी बाकी आहे. यावर पालकमंत्री पाटील यांनी, उर्वरित क्षेत्राची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पीक विमा कंपनीने तत्काळ पडताळणी करावी, असे निर्देश दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे नियमानुकुल करताना ग्राम विकास विभागाचा २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून या जागेची मोजणी फी भरण्याची कार्यवाही करावी. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी एम. पी. मगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर, गटविकास अधिकारी कसोदे, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार नामदेव पाटील, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवाडे, नशिराबाद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी प्रसाद यांचा वाढदिवसानिमित्त पालकमंत्री पाटील यांनी सत्कार केला. जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जि. प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, पी. एम. पाटील, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चेतन बरहाटे, रवी कंखरे, ॲड. भोलाणे, नरेंद्र सोनवणे, निलेश राजपूत, पंकज पाटील, हरिष आगीवाल, धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil
Gulabrao Patil News : जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार; गुलाबराव पाटील यांची किर्तनकारांना ग्वाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com