Jalgaon News : गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री पाटील

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while reviewing the development works in the taluka.
Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while reviewing the development works in the taluka.esakal
Updated on

Jalgaon News : शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा घटक हा ग्रामसेवक आहे. गावचा शाश्‍वत विकास करायचा असेल, तर ग्रामसेवकाची भूमिका महत्वपूर्ण आहे.

ग्रामसेवकांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. १७) पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध विभागांच्या विकास कामांबाबत आढावा बैठक झाली. (Guardian Minister Patil say Gram sevak Important Role in village development Reviewed various works in Jalgaon taluka Jalgaon News)

त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. पंधरावा वित्त आयोग, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, घरकुल, समाज कल्याण, मातोश्री ग्राम समृद्ध, पानंद रस्ते, आमदार निधीतील कामे, विविध विकास कामांच्या संदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला.

वित्त आयोगातून कामे

पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून ३७ कोटी ४९ लाख १० हजार ७५ रूपये निधी प्राप्त असून, त्यापैकी १५ कोटी १८ लाख ४७ हजार ८६२ इतका निधी खर्च करण्यात आला. शिल्लक निधी २२ कोटी ३० लाख ६२ हजार तत्काळ खर्च करून मुदतीत व दर्जेदार कामे करण्याच्या सुचना या वेळी देण्यात आल्या.

जलजीवन मिशन

जलजीवन मिशनअंतर्गत जळगाव तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींत ७८ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यासाठी १०० कोटी ५५ लाख ८९ हजार ९५३ रूपये निधी मंजूर आहे. या मंजूर योजनांपैकी ४७ योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. जळके, तरसोद, वसंतवाडी व विटनेर या अद्याप सुरु न झालेल्या ४ योजना मुदतीत सुरु करण्याबाबत या वेळी निर्देश देण्यात आले.

तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०२३-२४ साठी २२ कामे मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त सार्वजनिक शौचालय बांधकाम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर करून मुदतीत व दर्जेदार कामे करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while reviewing the development works in the taluka.
Jalgaon News : उदीड, मूग, तुरीच्या पेरण्यांवर यंदा परिणाम होण्याची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

टँकरने पाणी पुरवठ्याचे निर्देश

प्रधान मंत्री आवास योजना, शबरी घरकुल, रमाई घरकुल या योजनांमध्ये एकूण ५ हजार ६९५ घरकुल मंजूर असून, त्यापैकी ३ हजार ७६९ घरकुल पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घ्यावा.

मनरेगा अंतर्गत २२ गावांमध्ये मंजूर कामांचाही आढावा घेण्यात आला. मातोश्री ग्राम समृद्धी, पाणंद रस्त्यांच्या कामांची झाडाझडती घेण्यात आली. आवश्यकता असेल त्या गावांना तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.

प्रांताधिकारी सुधळकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, पद्माकर अहिरे, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, बांधकामचे उप अभियंता एस. आर. वंजारी आदी उपस्थित होते. विस्तार अधिकारी रविंद्र सपकाळे यांनी आभार मानले.

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while reviewing the development works in the taluka.
Jalgaon News : धरणगाव, पारोळा, बोदवड,भडगावला नवीन बस आगारांची निर्मिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.