Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीला पुन्हा झळाळी; जाणून घ्या दरवाढ.. | Gold Rate Today | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Rate Today

Gudi Padwa 2023 Gold Rate: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीला पुन्हा झळाळी; जाणून घ्या दरवाढ..

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात चढ- उतार होत असताना गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2023) पूर्वसंध्येला सोन्याचा दर साठ हजारांवर तर चांदीच्या दराने सत्तर हजारांचा आकडा पार केला होता. (gudi padwa 2023 rate hike in gold and silver jalgaon news)

गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात चढ- उतार होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला होता. ५७ हजार रुपये प्रतितोळा दर असताना गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याचे दर टप्प्याटप्प्याने वाढत गेले.

मंगळवारी जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचा दर जीएसटी वगळता प्रतितोळा ५९ हजार रुपये होता, त्यात जीएसटी समाविष्ट केल्यास तो ६१ हजारांवर पोचतो. तर चांदीचा प्रतिकिलो ६९ हजार ५००वर (जीएसटी वगळता) पोचला होता.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

चैत्र शुद्ध प्रतिपदा.. अर्थात, गुढीपाडवा. हिंदू पंचांगातील नववर्षाचा प्रारंभ. त्यानिमित्त विविध वस्तू व सुवर्ण खरेदीचा मुहूर्त या दिवशी साधला जातो. त्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासूनच सोने- चांदीच्या दरात वाढ होत होती. कालपेक्षा आज सोने- चांदीत प्रत्येकी ५०० रुपयांची दरवाढ झाली.