Jalgaon News : लांडोरखोरी वनउद्यानात सुविधांसाठी निधी देणार : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal

Jalgaon News : शहरातील लांडोरखोरी उद्यानात सुविधा करण्यासाठी शासनाकडून आपण निधी उपलब्ध करून घेतला आहे. आणखी सुविधांसाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

उद्यानातील वनसभागृहाचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी प्रास्ताविक केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, लांडोरखोरी वनउद्यान हे जळगांव शहरात मध्यभागी असुन, येथील रहिवाशांना नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेता यावा व विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी लागणारा निधी पुरवठा केला आहे. (Gulabrao Patil Say In Landor Khori Forest Park Funding for facilities Testimony at inauguration of Forest Hall Jalgaon News)

वन उद्यानात वन्यप्राण्यांच्या चिकित्सालयासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा करुन इमारत मंजुर करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमुद केले.

वनविभागाने लांडोरखोरी येथे केलेल्या विविध कामांचे त्यांनी कौतुक केले. आमदार भोळे म्हणाले, शहराच्या मध्यभागी असणाऱ्या वन उद्यानामध्ये पर्यावरण प्रेमी व नागरीक, तसेच योगा क्लब सदस्यांकडून होणाऱ्या सततच्या मागणीवरुन वन उद्यानात इतर विकास कामे, तसेच वनसभागृहाचे काम पुर्ण करुन जनसेवेचे काम केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil
Jalgaon News : जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

उद्‌घाटनाच्या कार्यक्रमापुर्वी मंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षपुजन करण्यात आले. जळगांव शहरातील नागरिक, निसर्ग प्रेमी, अशासकीय संस्था, योगा क्लब सदस्य, तसेच वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी या वेळी उपस्थित होते.

श्री. पवार यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांनी आभार मानले. सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव (प्रा.) नितीन बोरकर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Gulabrao Patil
Jalgaon News : उदीड, मूग, तुरीच्या पेरण्यांवर यंदा परिणाम होण्याची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com