नुकसानग्रस्त शेताचे सरसकट पंचनामे करा : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil on Field
Gulabrao Patil on Fieldesakal
Updated on

जळगाव : तालुक्यातील भोकर, पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना ९, १० जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने (Stormy Rain) दिलेल्या फटक्यामुळे सुमारे २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे (Crops) नुकसान झाले आहे. यात बहुतांश केळीचे (banana) क्षेत्र आहे. या नुकसानीची रविवारी (ता. १२) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. (Gulabrao Patil Statement on damaged Agricultural field Jalgaon Nashik News)

Gulabrao Patil on Field
काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा : गिरीश महाजन

रविवारी पालकमंत्री पाटील यांनी गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक, नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत, मंडळ कृषी अधिकारी एम. जी. जंगले, कृषी सहायिका अनिता जाधव, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना, आपल्या पीक व्यवस्थापनात बदल करावा असे सांगितले. राज्य सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली असून या आपत्तीच्या काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Gulabrao Patil on Field
Jalgaon : रात्रगस्तीला वाळू नेणारा ट्रॅक्टर जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com