Latest Marathi News |'हरहर महादेव चित्रपट' संभाजी ब्रिगेडने बंद पाडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials of Sambhaji Brigade giving a statement to manager of 'Inox' ​​that play of film 'Har Har Mahadev' should be stopped

Jalgaon : 'हरहर महादेव चित्रपट' संभाजी ब्रिगेडने बंद पाडला

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचा इतिहास दाखविल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने जळगाव येथील आयनॉक्स चित्रपटगृहातील ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला.

व्यवस्थापकाना निवेदन देत त्यांनी दुपारचा ‘खेळ’ न घेता प्रेक्षकांना पैसे परत केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकिचा इतिहास चित्रपटात दाखविण्यात येत असल्याचा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला. त्यानंतर आज जळगाव येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. (Har Har Mahadev movie Sambhaji Brigade stopped Inox ​​refund ticket money to audience Jalgaon News)

शहरातील ‘आयनॉक्स’चित्रपटगृहात दुपारी एकला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेवून खानदेश सेंट्रलमधील आयनॉक्स चित्रपटगृहावर धडकले.

त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा देत ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद करण्याची मागणी केली. त्यांनी थिएटरच्या व्यवस्थापकाना निवेदन दिले. त्यानंतर व्यवस्थापकांनी खेळ बंद करून ‘शो’चे प्रेक्षकांच्या तिकीटाचे पैसे परत केले. महानगराध्यक्ष संदीप पाटील, शहर प्रवक्ता कुंदन सूर्यवंशी,गोपाल पाटील, प्रमोद कुंभार, बाळू पाटील, अविनाश पाटील संदीप मांडोळे , चेतन सानप, सागर कोळी, राहुल पाटील, सतीश लाठी सहभागी झाले होते.