Latest Marathi News | जिल्‍हा रुग्णालयात विवाहितेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News

Crime Update : जिल्‍हा रुग्णालयात विवाहितेचा विनयभंग

जळगाव : जिल्‍हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊसमोरील जिन्‍यात अडवून एकाने महिलेचा विनयभंग केला.

जळगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय पीडिता जिल्‍हा रुग्णालयात आली. विजय ऊर्फ बबल्या दिलीप पाटील (रा. कुसुंबा, तुळजाईनगर) व त्याच्यासोबत इतर दोघांनी वॉर्ड क्रमांक नऊजवळील जिन्याजवळून पीडिता जात असताना, तिचा रस्ता अडविला. (Married woman molested in district hospital Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon : अवैध वाळूउपशाने बांभोरी पूल ‘Danger Zone’मध्ये

विजय ऊर्फ बबल्याने, ‘तू माझ्याशी संबंध ठेव, नाही तर मी तुला उचलून नेईल’, असे सांगून विवाहितेचा हात धरून विनयभंग केला.

याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिला पोलिस नाईक अलका शिंदे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon | शहरात सम, विषम पार्किंग झोन : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड