
Domestic Violence : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी मारहाण व छळ केल्याप्रकरणी पतीसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Harassment of married woman for 3 lakh rupees jalgaon Latest Marathi news)
हेही वाचा: धरणगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार; शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेरवाशीण रूपाली प्रशांत पाटील (वय २४) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथील प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्याशी २ जानेवारी २०१८ रोजी झाला होता.
पती प्रशांत पाटील यांनी पुण्यात घर घेण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहून आणावे, अशी मागणी केली होती. परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने त्या रागातून पतीने तिला मारहाण करून छळ करण्यास सुरवात केली.
हेही वाचा: 13 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला; पंधरा फूट खोल खाणीत बुडून मृत्यू
पैशांसाठी तिचे सासू, जेठ आणि जेठाणी यांनी देखील छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी रामेश्वर कॉलनीत निघून आल्या. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पती प्रशांत जगन्नाथ पाटील, सासू निलाबाई पाटील, जेठ वसंत पाटील आणि जेठाणी पुनम वसंत पाटील (सर्व रा. तावसे खुर्द, ता.चोपडा) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस नाईक संजय धनगर करीत आहे.
Web Title: Harassment Of Married Woman For 3 Lakh Rupees Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..