Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

Jalgaon: Assistant Inspector Kishore Pawar with the team to catch the thief
Jalgaon: Assistant Inspector Kishore Pawar with the team to catch the thiefesakal

जळगाव : शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान चोरट्यांनी फोडून ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी घडलेलल्या गुन्हा जिल्‍हापेठ पोलिसांनी आठच दिवसांत उघडकीस आणून दोन अल्पवयीन संशयितासह चोरट्यांच्या म्होरक्याला अटक केली व ऐवज जप्त केला आहे.

साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी हेमंत नंदलाल रंगलानी (वय ५०) यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमध्ये जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान आहे. शनिवारी (ता. ३१) रात्री आठनंतर दुकान बंद करून ते घरी गेले. (Hardware shop burglar arrested Lock broken help of minor accomplices Jalgaon Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Jalgaon: Assistant Inspector Kishore Pawar with the team to catch the thief
Nashik News : रेकॉर्डिंग अभावी CCTV फक्त शो पीस! बँकांसह व्यापाऱ्यांकडे डेटा सेव्ह नसल्याने अडचण

रविवार असल्याने दुकान बंद होते. सोमवारी (ता. २) सकाळी अकराला त्यांच्या दुकानावर काम करणारा कामगार सुरेश फेगडे यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. हेमंत रंगलानी यांनी दुकानात पाहणी केली. यामध्ये चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

हेमंत रंगलाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती शटरचे कुलूप तोडून दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर सामान, असा एकूण ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेले होते.

दुकान मालक हेमंत रंगलानी यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीवरून प्रभारी अधिकारी किशोर पवार यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश देशमुख, गणेश पाटील, सलीम तडवी, जुबेर तडवी, सुधाकर पाटील यांनी अल्पवयीन साथीदारासह विशाल ऊर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाऊसजवळ, भिलाटी, तांबापुरा) याला ताब्यात घेतले.

Jalgaon: Assistant Inspector Kishore Pawar with the team to catch the thief
Nashik Crime News : शहरात जबरी चोऱ्या अन् घरफोड्यांनी गाठला कळस!

सीसीटीव्ही फोडले

ॲस्टीन ऊर्फ युवराज याचे साथीदार आक्या व सोन्यायासोबत सोने चोरले होते. संशयितांना खाक्या दाखविताच ॲस्टीन याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांनी अगोदर दुकानाबाहेरील सीसीटीव्ही फोडून शटरचे कुलूप तोडले. सीसीटीव्हीतील हालचालीवरून संशय बळावल्याने पोलिसांनी संशयित ॲस्‍टीला बेड्या ठोकल्या. चोरीतील सर्व साहित्य पोलिसांना चोट्यांनी काढून दिले आहे.

Jalgaon: Assistant Inspector Kishore Pawar with the team to catch the thief
Crime News : नागपाड्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार...आरोपी किशोरवयीन अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com