Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन

Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन

Jalgaon Rain News : संपूर्ण ऑगस्ट महिना दडी मारून बसलेल्या वरुणराजाने गुरुवारी (ता. ७) अखेर जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. काही भागांत जोरदार, तर काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.

पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत अधूनमधून बरसत होता. महिन्याच्या खंडाने कोमात गेलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्यासह खानदेशात व संपूर्ण राज्यातच पावसाने मोठा ‘गॅप’ घेतला. संपूर्ण ऑगस्ट पावसाविना गेला. त्यामुळे यंदाच्या मोसमात केवळ जुलैतील थोड्याफार पावसाने तग धरून राहिलेली पिके धोक्यात आली होती. (heavy rainfall in jalgaon news)

एकीकडे पिकांची वाट खुंटून सर्व हंगामच वाया जाण्याच्या मार्गावर होता; तर दुसरीकडे प्रकल्पांमधील कमी साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली होती. शिवाय, पाऊसच न झाल्याने उकाडाही निर्माण होऊन तापमान ३५ अंशांवर पोचल्याने नागरिक त्रस्त होते. सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते व त्यासाठी नागरिकांनी देव पाण्यात घातले होते.

बळीराजासह नागरिक सुखावले

अखेर भगवंताने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वरुणराजाला आदेश करीत धरतीवर बरसण्यासाठी पाठविले. तिकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, तर इकडे बुधवार (ता. ६)पासून राज्यात पावसाचे वातावरण तयार होऊ लागले. गुरुवारी पहाटे तीनपासूनच जळगाव शहरासह जिल्ह्यात काही भागात पावसाचे सुखद आगमन झाले.

सकाळी आठपर्यंत पाऊस बरसत होता. काही वेळ विश्रांती घेतल्यावर दुपारी तीननंतर शहरात पुन्हा चांगल्या पावसाने हजेरी लावली. पाचोरा, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर आदी भागांतही चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील अन्य भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन
Nashik Rain Update: शहरात 40 दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी

पिकांना मिळाले जीवदान

आणखी आठवडाभर पाऊस आला नसता, तर सर्व खरीप हंगाम हातचा गेला असता. मात्र, गुरुवारच्या पावसाने हा धोका तूर्तास टळला आहे. कपाशी, मका, दादर आदी सर्वच पिकांना या पावसाने जीवदान दिले आहे. आगामी तीन-चार दिवस पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

रावेर तालुक्यात पाऊस

तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वरुणराजा तालुक्यात बरसला. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून उकाड्याने त्रस्त झालेल्यांना या पावसामुळे वातावरणात गारवा येऊन दिलासा मिळाला. मध्यरात्रीनंतर समाधानकारक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दीडपासून समाधानकारक, तर दोन ते तीनपर्यंत मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन
Maharashtra Rain Crisis : राज्यातील 216 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com