Jalgaon Crime News : अभियंता तरुणीला ऑनलाईन खरेदी पडली महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime News

Jalgaon Crime News : अभियंता तरुणीला ऑनलाईन खरेदी पडली महाग

जळगाव : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने ऑनलाईन खासगी कपडे खरेदी केले होते.

मात्र, हे कपडे परत करण्यासाठी तिने गुगलवरून ब्लू-डार्ट कुरियरचा नंबर मिळवून त्यावर संपर्क केला. त्या क्रमांकावर बसलेल्या भामट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्याद्वारे तब्बल २० हजार ९९६ रुपये बँक खात्यातून लंपास केले. (In Online shopping is Fraud with young engineer girl Jalgaon Crime News )

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

गेंदालाल मिल भागातील अभियांत्रिकीची विद्यार्थिनी कुलसूम बी मोहंमद कदील शेख (वय २१) हिने ऑनलाईन खासगी कपडे खरेदी केले होते. मात्र, प्रॉब्लेम आल्याने तिने कपडे परतविण्यासाठी पार्सल आणून देणाऱ्या ब्लू-डार्ट कुरियर सर्व्हिसचा क्रमांक गुगलवरून मिळविला. त्या क्रमांकावर संपर्क केला.

सायबर गुन्हेगाराने त्या तरुणीच्या मोबाईलवर लिंक पाठवून फॉर्म फीलअप करण्यास सांगितले. तसे, करताच त्या तरुणीच्या खात्यातून सहा वेळेस ऑनलाईन रक्कम लंपास करण्यात आली. याबाबत त्या तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत २० हजार ९९६ रुपये लंपास केल्याचे नमूद केले आहे.