Jalgaon News : महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात संक्रांतीचा तीळगुळ ‘कडू’; किशोर पाटलांसह पालकमंत्र्यांची नाराजी

तीनही पक्षांच्या महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची नाराजी पालकमंत्र्यांसह आमदार किशोर पाटलांनी उघडपणे व्यासपीठावरच बोलून दाखवली.
The meeting of the joint grand alliance of BJP, Shiv Sena and NCP Ajit Pawar group, which is in power in the state, was held on Sunday.
The meeting of the joint grand alliance of BJP, Shiv Sena and NCP Ajit Pawar group, which is in power in the state, was held on Sunday.esakal

Jalgaon News : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांच्या महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची नाराजी पालकमंत्र्यांसह आमदार किशोर पाटलांनी उघडपणे व्यासपीठावरच बोलून दाखवली.

या नाराजी नाट्यामुळे पाचोऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला. (In very first meeting of Mahayuti Tilgul on Sankranti was bitter jalgaon news)

तर दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची बाजू मांडताना त्यावर गेल्या काळात काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करु, अशी ग्वाही दिली. मात्र, समन्वय साधण्यासाठी आयोजित संक्रांतीच्या पाश्‍र्वभूमीवरील या पहिल्याच मेळाव्यात महायुतीचा तीळगुळ मात्र ‘कडू’ झाल्याचे दिसले.

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार गट या तीनही पक्षांमध्ये समन्वय असावा म्हणून, तीनही पक्षांचे संयुक्त मेळावे राज्यभर घेण्याचे ठरले. त्यानुसार पहिला मेळावा राज्यात ठिकठिकाणी रविवारी पार पडला.

जळगावात श्रीकृष्ण लॉन्स येथे मेळावा झाला. त्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील, लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अशोक कांडेलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, निलेश पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, आरपीआयचे(आठवले गट) अनिल अडकमोल, उमेश नेमाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

The meeting of the joint grand alliance of BJP, Shiv Sena and NCP Ajit Pawar group, which is in power in the state, was held on Sunday.
Jalgaon News : बोदवड येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

‘पाचोऱ्या’तून नाराजी

या मेळाव्यात पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील भाषण करताना म्हणाले, २००१पासून आजपर्यंत सेनेचे काम करत असताना आमच्यापैकी एकही कार्यकर्त्याने गद्दारी केलेली नाही. लोकसभेला आम्ही भाजप उमेदवारासाठी रात्रीचा दिवस करतो.. मात्र, विधानसभेच्या वेळी भाजपचा कार्यकर्ता विरोधात उभा राहतो, व पक्षाकडून त्याच्याव कारवाई होत नाही. असे असेल तर शिवसैनिकांनी काय करावे? कुटुंबाचा मेळवा म्हणून ही तक्रार केल्याचे सांगत त्यांनी संक्रांतीनिमित्त तीळगुळ घ्या.. गोड बोला.. अशा शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्र्यांचे भाजपला चिमटे

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविताना राज्यात सर्व नेते एकत्रितपणे काम करत असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे म्हणून हा मेळावा असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा, विधानसभेला आपण एकत्र लढतो. मात्र, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला युती होत नाही, त्या खालच्या निवडणुकांमध्येही महायुती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

किशोर पाटलांच्या तक्रारीचा उल्लेख करत त्यांनीही गिरीश महाजनांकडे शिवसेनेतील कार्यकर्त्यांमधील नाराजीची भावना बोलून दाखवली. कोणत्याही निवडणुकीत महायुतीतील कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आगाऊपणा करत असेल तर त्याला दाबले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

The meeting of the joint grand alliance of BJP, Shiv Sena and NCP Ajit Pawar group, which is in power in the state, was held on Sunday.
Jalgaon News : विहिरीत पडलेल्या मनोरूग्णाला काढले

प्रभू राम सर्वांचेच!

राजूमामा भोळे यांनी २२ जानेवारीस अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले असले तरी ‘मामा आमच्याही कार्यकर्त्यांनी राम मंदिरासाठी प्राणांची आहुती दिली आहे. राम कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, राम सर्वांचाच आहे..’ असे म्हणते भाजपला टोला लगावला.

चुकांची दुरुस्ती करु : महाजन

पालकमंत्र्यांसह आमदार किशोर पाटलांनी भर मेळाव्यात भाजपबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये, प्रत्येक ठिकाणी काही ना काही नाराजी असेलच. या तक्रारी, नाराजी व्यक्त करण्यासाठीच हे समन्वयाचे मेळाव, बैठका होत आहेत.

गेल्या काळात काही ठिकाणी चुका झाल्यात, त्या आम्ही पुढच्या काळात नक्कीच दुरुस्त करु, असेही श्री. महाजन म्हणाले. मेळाव्यात आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, चिमणराव पाटील, खासदार उन्मेश पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

The meeting of the joint grand alliance of BJP, Shiv Sena and NCP Ajit Pawar group, which is in power in the state, was held on Sunday.
Jalgaon News : बांगड्या विक्रेत्या बालिकेचे अपहरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com