
Success Story : अर्चितच्या ‘पीपीई कीट’ला भारतीय पेटंट
जळगाव : प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव मोजण्याचे यंत्र (Bleeding measuring device) म्हणून अर्चित पाटील या विद्यार्थ्याने विकसित कलेल्या ‘पीपीई कीट’ने (PPE Kit) पेटंट (Petant) मिळविले आहे. दोन वर्षंपूर्वीच हे यंत्र विकसित करणारा अर्चित राहुल पाटील हा विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या या शोधाची नोंदणी भारतीय पेटंट कार्यालयांत झाली असून त्यासाठी अनुदानही मिळाले आहे. त्याचा हा शोध भारतीय पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित झाल्यानंतर एक वर्षभरात कोणीही त्यावर हरकत घेतली नाही. त्यामुळे त्याचे पेटंट अर्चित यास मिळाले आहे. (Indian patent for Archit patil PPE kit jalgaon Success Story)
हेही वाचा: आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाड्या धावणार; 6 जुलैपासून होणार रवाना
असे आहे कीट, त्याची उपयुक्तता
पीपीई किट हे प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव मोजण्याचे साधन आहे. या पीपीईचा वापर करून डॉक्टरांना अनेक मातांचे प्राण वाचवता आता वाचवता येत आहेत. या नवीन उपकरणासाठी त्याला शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याने यावर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. त्यांचे हे यश वाखाणण्याजोगे आहे, यासाठी त्यांना केवळ जळगावातील लोकांकडूनच नव्हे, तर जगभरातील शास्त्रज्ञांकडून त्याची प्रशंसा होत आहे.
हेही वाचा: कजगावला जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे पसार
Web Title: Indian Patent For Archit Patil Ppe Kit Jalgaon Success Story News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..