
आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाड्या धावणार; 6 जुलैपासून होणार रवाना
भुसावळ (जि. जळगाव) : विदर्भ (Vidarbha) आणि खानदेशातील वारकऱ्यांसाठी (Khandesh Warkari) चार विशेष रेल्वेगाड्या (Railways) आणि त्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या, अशा १६ गाड्या वारी विशेष म्हणून चालविण्यात येणार आहे. या गाड्या नागपूर, अमरावती व खामगाव येथून पंढरपूरसाठी रवाना होतील. (Special trains to run on Ashadi Ekadashi Departure from July 6 Jalgaon news)
विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक आणि डब्यांची संरचना अशी : नागपूर-मिरज-नागपूर विशेष गाडी ६ आणि ९ जुलैला नागपूरहून सकाळी ८:५० ला सुटेल आणि पुढल्या दिवशी ७ आणि १० जुलैला सकाळी ११:५५ ला मिरजेत पोहोचेल. परतीच्या प्रवासात मिरज - नागपूर विशेष ७ आणि १० जुलैला दुपारी १२:५५ ला मिरजेहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ८ आणि ११ जुलैला नागपूरला दुपारी १२:२५ पोहोचेल.
नागपूर-पंढरपूर गाडी
नागपूर-पंढरपूर-नागपूर विशेष गाडी ७ आणि १० जुलैला नागपूरहून सकाळी ८:५० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ आणि ११ जुलैला सकाळी ८ वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूर- नागपूर विशेष ८ आणि ११ जुलैला सायंकाळी पाचला पंढरपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ९ आणि १२ जुलैला नागपूरला दुपारी १२:२५ ला पोहोचेल.
अमरावती-पंढरपूर गाडी
नवी अमरावती - पंढरपूर- नवी अमरावती विशेष गाडी ६ आणि ९ जुलैला नवी अमरावतीहुन दुपारी २:४० ला सुटेल आणि पुढल्या दिवशी ७ आणि १० जुलैला सकाळी ९:१० ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११२० पंढरपूर - नवी अमरावती विशेष ७ आणि १० जुलैला सायंकाळी ७:१० ला पंढरपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ८ आणि ११ जुलैला नवी अमरावतीला दुपारी १२:४० ला पोहोचेल.
हेही वाचा: Jalgaon : पोलिस मुख्यालयासमोरच ATM फोडले; गुन्हा दाखल
खामगाव - पंढरपूर गाडी
खामगाव - पंढरपूर- खामगाव विशेष गाडी ७ आणि १० जुलैला खामगावहून सकाळी साडेअकराला सुटेल आणि पुढल्या दिवशी ८ आणि ११ जुलैला पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूर खामगाव विशेष ८ आणि ११ जुलैला पहाटे पाचला पंढरपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ९ व १२ जुलैला खामगावला सायंकाळी साडेसातला पोहोचेल. सर्व विठ्ठल भक्तांनी रेल्वेच्या या वारी विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: राजकीय खेळी पूर्ण, न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा : चिमणराव पाटील
Web Title: Special Trains To Run On Ashadi Ekadashi Departure From July 6 Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..