पाकिस्तानला धूळ चारणारे ‘T-55’ रणगाडे भुसावळात स्थापन

T-55 Tank
T-55 Tankesakal

भुसावळ (जि. जळगाव) : सन १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात (India-Pakistan War) पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणारे भारतीय लष्करातील T-55 रणगाडे (T-55 Tanks) अखेर भुसावळ आयुध निर्माणीत (Bhusaval Ordnance Production) स्थापन करण्यात आले आहे. आयुध निर्माणीने हे रणगाडे जनतेला समर्पित केले असून, आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे या परिसरात भेट देणाऱ्या नागरिकांना प्रेरणा मिळणार असून, नागरिक येथे सेल्फी घेण्यासाठी येत आहेत आणि रणगाड्याचा इतिहास जाणून घेत आहेत. (indian T55 tanks installed in Bhusawal Jalgaon News)

सन १९७१ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. यामध्ये भारतीय लष्करातील टी-५५ रणगाड्याने पश्चिम आघाडीवर बसंतर आणि बारपीडच्या लढाईत मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले. तथापि, यानंतर अनेक अत्याधुनिक रणगाडे आले आणि नंतर टी-५५ सैन्यातून निवृत्त झाले. आता हे टँक भुसावळ आयुध निर्माणीत स्थापन झाले असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

T-55 Tank
गिरणा पट्ट्यात कांदा मातीमोल; विक्रमी उत्पादनाने भाव घसरले

टी-५५ रणगाड्याची वैशिष्ट्ये

टी-५५ हा जगातील एकमेव टँक होता की त्या काळात युद्धात शत्रूचा पराभव करण्यास सक्षम मानला जात होता. या रणगाड्याची लांबी नऊ मीटर, रुंदी ३.७ मीटर आणि उंची २.४० मीटर आहे. त्याचे वजन सुमारे ३६ हजार किलो आहे. त्यात चार क्रू मेंबर्स बसतात. मुख्य तोफा १०० एमएमडी १०-टी झिरी आणि दुय्यम बंदूक १२.५ मिमी मशीन गन आहे. त्यात विमानविरोधी बंदूकही आहे. या टँकची १४ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

T-55 Tank
73 लाखांचा गुटखा जप्त!; 2 महिन्यातील चौथी कारवाई

सोव्हिएत युनियनने १९४६ मध्ये केली निर्मिती

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात, टी-५५ रणगाडे भारताच्या पश्चिम सेक्टरमध्ये पंजाब-राजस्थान सीमेवर तैनात होते. १९४६ ते १९८१ या काळात सोव्हिएत युनियनने या टँकची निर्मिती केली होती. त्यानंतर १९५६ ते १९८९ या काळात पोलंडनेही या मॉडेल टँकची निर्मिती केली. या दोन देशांच्या धर्तीवर हे मॉडेल चेकोस्लोव्हाकियामध्ये १९५७ ते १९८३ दरम्यान तयार करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com