73 लाखांचा गुटखा जप्त!; 2 महिन्यातील चौथी कारवाई

Seized Gutkha
Seized Gutkhaesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरची शहर पोलिसांनी तपासणी केली असता त्यात ७३ लाखांचा गुटखा (Gutkha) आढळून आला. ही कारवाई रविवारी (ता. २२) सायंकाळी करण्यात आली असून, एकूण ९३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Seize) केला आहे. या वेळी पोलिसांनी चालकासह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. (73 lakh worth gutka seized fourth action in 2 months Dhule News)

मध्य प्रदेशातून येणाऱ्या कंटेनरमध्ये (एनएल ०१, क्यू ४५३५) अवैध गुटखा असल्याची गुप्त माहिती शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना रविवारी (ता.२२) दुपारी मिळाली. या पार्श्र्वभूमीवर पथकाने शहरातील ओझरजवळ सापळा रचून कंटेनर पकडला. त्याची तपासणी केली असता त्यात गुटख्याचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत ७३ लाख असून, २० लाखांचा कंटेनर असा एकूण ९३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यात उमर मोहम्मद दिनू मोहम्मद (वय ४२, रा. बिशमभरा, जि. मथुरा, मध्य प्रदेश) व इमरान कुशल (वय ३२, रा. शाहजादपूर, जि. मथुरा, मध्य प्रदेश) अशी ताब्यातील संशयितांची नावे आहेत.

Seized Gutkha
Dhule : माय-लेकीची झोपेतच हत्या

या कारवाईमुळे अवैध धंद्यांची तस्करी करणाऱ्यांच्या गोटात चांगलीच उडाली आहे. दरम्यान, गत दोन महिन्यांत अवैध गुटख्याची ही चौथी कारवाई आहे. या आधी ग्रामीण पोलिसांना कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडण्यात यश आले आहे. यानंतर शहर पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. यामुळे तालुक्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना जबर चपराक बसली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस हे करीत आहेत.

Seized Gutkha
गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

ही कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, सागर ढिकले, राहुल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, महेंद्र पाटील, अमोल पाटील, अमोल भोसले, विनोद पवन पाटील आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com