Latest Marathi News | RLच्या फर्मची CBIकडून तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

Jalgaon News : RLच्या फर्मची CBIकडून तपासणी

जळगाव : कोटयवधींच्या थकित कर्ज प्रकरणी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीवरुन केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआयने मंगळवारी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या आर. एल. ज्वेलर्स व विविध फर्मची तपासणी केली.

जळगावातील तीन, नाशिकमधील एक शोरूम, व दोन निवासस्थाने अशा एकूण सहा ठिकाणांचे सर्च वॉरंट घेऊन सीबीआयची पथके प्रत्येक ठिकाणी तपासणी केली. तब्बल बारा तास ही मोहिम सुरु होती.

ईश्वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या आर. एल व अन्य फर्मने स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून कोटयवधींचे कर्ज घेतले होते. मुद्दल व व्याज अशी मोठी रक्कम आर. एल. फर्मकडे थकित असल्याचा बॅंकेचा दावा असून त्याबाबत कायदेशीर लढाई सुरु आहे. (Investigation by CBI of RL firm Jalgaon Crime News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Nashik Crime News : चक्क! Driving Schoolही बेकायदेशीर

सीबीआयकडे तक्रार

स्टेट बॅंकेने याबाबत सीबीआयकडे लेखी तक्रार केली असून त्या तक्रारीवरुन सीबीआई पथकांनी मंगळवारी ही तपासणी केली. जैन यांच्या मालकीच्या जळगावातील आर. एल. ज्वेलर्स, मानराज मोटर्स, नेक्सा असे तीन, नाशिकमधील ज्वेलर्स अशा एकूण चार फर्मची तपासणी करण्यात आली. जळगाव व मुंबईतील निवासस्थानीही तपासणी करण्यात आली.

६० जणांची पथके

मंगळवारी सकाळी सहाला या सहाही जागी एकाच वेळी सीबीआयची पथके पोचली व त्यांनी तपासणी सुरु केली. जवळपास साठ अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते. सकाळी सहापासून सुरु झालेली ही तपासणी मोहिम सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. यात पथकांनी विविध स्वरूपाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली.

"सीबीआयचे पथक आज सकाळपासून विविध ठिकाणी तपासणीसाठी आले. त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्रे आम्ही सादर केली. या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करीत आहोत."

- ईश्वरलाल जैन, संचालक, आर. एल. ज्वेलर्स.

हेही वाचा: Jalagon News : चोपडा पालिकेचे अधिकारी रडारवर!; सफाई कंत्राटातील अनियमितता सिद्ध