Jalgaon News : पारोळ्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे अवैध रिफिलिंग सेंटरचा मुद्दा ऐरणीवर

तालुक्यातील म्हसवे शिवारात वाहनात अवैध गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) रात्री घडली. एकापाठोपाठ नऊ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.
Burned vehicles after gas cylinder explosion.
Burned vehicles after gas cylinder explosion.esakal

Jalgaon News : तालुक्यातील म्हसवे शिवारात वाहनात अवैध गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) रात्री घडली. एकापाठोपाठ नऊ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.

या स्फोटात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दोन ओमिनी जळून खाक झाल्या आहे. या दुर्घटनेमुळे गाव भयभीत झाले आहे. या प्रकरणी येथील एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (issue of illegal refilling centers in Parole due to explosions of gas cylinders jalgaon news)

दरम्यान, या घटनेमुळे अवैध गॅस सिलिंडर रिफिलिंग सेंटरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील म्हसवे शिवारात शुक्रवारी (ता. १९) रात्री साडेनऊच्या सुमारास महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरावर मोकळ्या जागेत वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरताना एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाला.

त्यात एका पाठोपाठ तब्बल नऊ सिलिंडर फुटून गावात भूकंप सदृश किंवा बॉम्ब पडल्यासारखे आवाज आल्याने संपूर्ण गाव भयभीत झाले. त्यात दोन व्हॅन जळाल्याने मोठा आगेचा लोळ उठला होता. संपूर्ण गावकऱ्यांनी काही क्षण आपला जीव मुठीत ठेवला.

सुमारे अर्धा तास हा थरार परिसरात सुरू होता. परंतु काही क्षणात अग्निशामक दल पोचल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. आज प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यात परिसरात एकूण २१ गॅस सिलिंडर होते.

त्यात नऊ सिलिंडरचा जागेवरच स्फोट झाला तर १३ अजूनही परिसरात शिल्लक होते. सुदैवाने आगीची धग हा उर्वरित सिलिंडरपर्यंत पोचली नाही. त्यामुळे मोठी हानी टळली. यात व्यावसायिक व घरगुती सिलिंडर परिसरात आढळून आले. या ठिकाणी अवैध गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन ओमिनी कार जागेवर जळून खाक झाल्या.

Burned vehicles after gas cylinder explosion.
Jalgaon Municipality News : बेशिस्त वाहन धारकांविरोधात कारवाईचा बडगा

घटनेनंतर संशयितांची पळापळ...

स्फोट इतका भीषण होता की कारचा फक्त लोखंडी ढाचा शिल्लक राहिला होता. याबाबत खंडेराव रामराव पाटील उर्फ मोठा भाऊ (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांच्यासह इतर काही जण मिळून संगनमत करून या परिसरात अवैधरित्या गॅस भरत होते.

गॅस सिलिंडरच्या स्फोटात सर्व संशयित आपला जीव वाचवीत घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. यात सुमारे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी घटनास्थळी अमळनेर विभागीय पोलिस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आदींनी भेट दिली व घटनास्थळी पाहणी केली.

Burned vehicles after gas cylinder explosion.
Jalgaon News : म्हसवे शिवारात गॅस सिलिंडरचा स्फोट

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com