Jalgaon Sub Registrar Arrested
esakal
जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केलेले उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी याच्या लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत एक कोटी सात लाख ४४ हजार ७५ रुपये आहे. उपनिबंधक जगदीश बारी (वय ५६, रा. शांतीनगर, भुसावळ) असं या आरोपीचं नाव आहे, त्याला लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.