Jalgaon News : जैन मंदिराला अतिक्रमणाचा विळखा; महापालिकेने लक्ष देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : जैन मंदिराला अतिक्रमणाचा विळखा; महापालिकेने लक्ष देण्याची मागणी

जळगाव : शहरातील काँग्रेस भुवनसमोरील श्री वासूपुज्य जैन मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार, मंदिराचा आजूबाजूचा व समोरील भागात लोटगाडीवर अनेक रेडिमेड कापडविक्रेते, खाद्यपदार्थविक्रेते, लाकूड सामान बनवून विक्री करणारे, कापडविक्रेते यांच्या सामान साठवणुकीच्या वजनदार मोठमोठ्या पेट्या यांनी अतिक्रमण करून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. (Jain temple encroachment reported Demand for attention of jalgaon Municipal Corporation Jalgaon News)

कापडविक्रेते, ग्राहक, ग्राहकांच्या वाहनांमुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश करणे अवघड होत आहे. मंदिराभोवती झालेला अतिक्रमणाचा विळखा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढावा, जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष द्यावे, अशी मागणी श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

मंदिराचे अध्यक्ष ललित लोडाया, ट्रस्टी नयन शाह, जितेंद्र शाह, दिलीप गांधी, शांतिलाल जैन यांसह देवभक्त भाविकांनी मागणी केली आहे. पालकमंत्री, पोलिस अधीक्षक, शहर वाहतूक शाखा आदींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अतिक्रमणामुळे श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक मंदिरासमोर वाहन पार्क करण्यास खूप मोठी अडचण निर्माण होत आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Jalgaon News | पाचोरा रेल्वेस्थानक होणार ‘स्मार्ट’ : डीआरएम केडिया

खूप वेळा वाहतूक जाम होऊन वाद झालेले आहेत. महिला भाविकांना अडचणीतून जावे लागते. अनेक वेळा महिलांना छेडछाडीचा प्रकार होऊन विनयभंगाचे प्रकार घडलेले आहेत.

सद्यःस्थितीत देवदर्शन व पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे सर्व अतिक्रमण तातडीने काढणे आवश्यक आहे. या अगोदरही महापालिका आयुक्तांना कायमस्वरूपी अतिक्रमण काढणेबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे.

पण निवेदन दिल्यानंतर दोन-तीन दिवस लोटगाड्या काढण्यात येतात. पुन्हा तसेच अतिक्रमण राहते. प्रशासनास विनंती आहे, की त्यांनी संबंधित अतिक्रमण कायमस्वरूपी काढावे अन्यथा भाविक संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: Jalgaon Sand Transport : रात्रभर वाळूची चोरटी वाहतूक; तरवाडे येथील ग्रामस्थ हैराण