
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सायंकाळी मित्रांसोबत रनिंगला गेलेल्या १३ वर्षीय बालकावर दबा धरुन बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना गणेशपूर (ता. चाळीसगाव) शिवारातील पाटणा रस्त्यावर शनिवारी (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी रिंकेश गणेश मोरे (वय १३) हा आपल्या तीन मित्रांसोबत पाटणा रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास रनिंग करण्यासाठी निघाला होता. (13 year old boy died in leopard attack in chalisgaon )