Latest Marathi News | जळगाव : चाळीसगाव तालुक्यात रस्ते आपघातात सात महीन्यात 14 मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patholes

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात रस्ते आपघातात सात महीन्यात 14 मृत्यू

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील चाळीसगाव ते धुळे महामार्गावर रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे सात महिन्यात चौदा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्यावरील खड्डे आजही पाहीजे तसे बुजविले गेले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जरी सुरु असले तरी हा महामार्ग होईल तेव्हा होईल मात्र खड्डे तरी व्यवस्थित बुजवा अशी मागणी होत आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: खेड ः नांदिवली ढेबेवाडीतील चिमुकल्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

सात महिन्यात चौदा जणांचा मृत्यू

अत्यंत रहदारीचे असलेले चाळीसगाव-धुळे व मालेगाव चाळीसगाव या महामार्गावर जानेवारी ते जुलै दरम्यान १४ जणांनी रोड आपघातात आपला जीव गमावला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे तसेच अनेक चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर हे आपघात होत आसताता यामुळे रस्त्यावरील धोकेदायक खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी होत आहे.

खड्डे बनले जीवघेणी

चाळीसगाव -धुळे रस्त्यावर खड्यांच्या संदर्भात दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत खड्डे बुजविले मात्र हे खड्डे बुजवितांना काही बुजविले तर काही खड्डे सोडून दिले. गिरणा पुलादरम्यान काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. जुन व जुलै महीन्यात सहा जणांनी आपला जीव गमावला असल्याची नोंद मेहुणबारे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा: सोन्याची चेन चोरणाऱ्याला अटक; 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

''पावसाळ्यात रस्त्यावरील ओलाव्यामुळे गाड्या घसरण्याची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे वेगाने गाडी चालविण्याचा मोह टाळावा. घाई- गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहनांची काळजी रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.'' - विष्णू आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहुणबारे.

Web Title: Jalgaon 14 Deaths In Seven Months In Road Accidents In Chalisgaon Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..