Jalgaon Rain Update : आतापर्यंत 183 मिलिमीटर पाऊस! 2 दिवसांपासून पावसाचा मुक्काम; पेरण्या पूर्णत्वाकडे

Jalgaon News : २२ जूनपर्यंत पावसाने ओढ दिली होती. जवळपास प्रत्येक तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता, तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नव्हता.
Farmer Sowing
Farmer Sowingesakal

Jalgaon Rain Update : जिल्ह्यात दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शनिवारी (ता. ६) व रविवारी (ता. ७) अधूनमधून पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. (183 mm of rain stopped for 2 days Towards completion of sowing)

२२ जूनपर्यंत पावसाने ओढ दिली होती. जवळपास प्रत्येक तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता, तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सध्या दोन दिवसांपासून अधून मधून मात्र दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.

दिवसभर ढगाळ वातावरणही आहे. सर्वत्र हिरवळ झाली आहे. जून अखेरपर्यंत १६२.४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यात गेल्या पाच दिवसांत १९ मिलिमीटरची भर पडली आहे. एकूण सरासरी १८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (latest marathi news)

Farmer Sowing
Mumbai Heavy Rain : पावसाने थांबवली मुंबईची लाईफ लाईन, प्रवाशांचा रेल्वेरुळांवरुन धोकादायक प्रवास

तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जळगाव--१९५.४

भुसावळ- १७३

यावल--१३८

रावेर--१०१.५

मुक्ताईनगर--१४९.०

अमळनेर-- १८१.४

चोपडा--९०.३

एरंडोल--१३७.७

पारोळा--१२३.३

चाळीसगाव- १८३.१

जामनेर--१४८.९

पाचोरा--१९५.५

भडगाव--१६२.६

धरणगाव--१२०.५

बोदवड--१८२.०

Farmer Sowing
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे साचले पाणी; 'या' स्थानकांवरील लोकलसेवा विस्कळीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com