Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे साचले पाणी; 'या' स्थानकांवरील लोकलसेवा विस्कळीत

Mumbai Local: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साठल्याने नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.
Mumbai Rain Affected Local Service
Mumbai Rain Affected Local ServiceEsakal

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साठल्याने नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुर्ला स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस 30 मिनिटं उशिराने धावत आहेत. याचा मध्य रेल्वे आणि हार्बर लाइन यांना फटका बसला आहे.

संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आणि त्यामुळे रविवारी कल्याण-कसारा सेक्शनमध्ये खडवली आणि टिटवाळा दरम्यान लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली होती, पण आजही तशीच परिस्थिती आहे.

दरम्यान या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार असून. शहरात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, सोमवार, 8 जुलै रोजी दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस पडत राहील, रात्री मेघगर्जनेसह वादळाची शक्यता आहे.

दरम्यान रविवारी वादळ आणि पावसामुळे रुळांवर झाड पडल्याने कसारा आणि टिटवाळा स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. पुढे, आटगाव आणि ठाणसीत स्थानकांदरम्यान रुळांवर माती आली आणि वाशिंद स्थानकात रुळांवर एक झाड पडले, त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. सोमवार म्हणजेच आजपासून या मार्गांवर रेल्वे सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

स्थानिक हवामान विभागाने सांगितले की, मुंबईच्या दिंडोशीमध्ये सोमवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरू होता, अनेक भागात पाणी साचले होते.

दरम्यान पहाटे चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिंडोशीत अवघ्या तासाभरात तब्बल 92 मिमी पाऊस पडला आहे.

मुंबईवर सध्या तीव्र पावसाच्या सरी कोसळत आहेत, मुंबईत सतत मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. उत्तर उपनगरात सर्वाधिक पाऊस पडेल.

गेल्या काही तासांत मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईच्या काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात जाताना थेट परिस्थिती पाहूण बाहेर पडवे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहतूक विस्कळीत

संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असून, मुंबईच्या विविध भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे शिवाय रेल्वे सेवेवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे.

भांडुप रेल्वे हे पाण्याखाली गेले असून सी एस एमटी वरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली तर लांब पल्ल्याच्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठाणे आणि दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या सायन परिसरातील गांधी मार्केट मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

याबरोबर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com