'बाळा, आज जाऊ नको...'; वडिलांचे शब्द ठरले अखेरचे, मोबाईल उचलताना रेल्वेतून पडून मृत्यू, १ दिवस आधी घेतलेला नवा लॅपटॉप

MEMU local Train Accident: मोबाईल उचलताना रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Youth Died In MEMU local Train accident

Youth Died In MEMU local Train accident

ESakal

Updated on

मेहुणबारे : 'बाळा, आज जाऊ नको, मी शेतातील काम आटोपतो, उद्या आपण दोघे सोबत जाऊ, असे वडिलांनी कळवळून सांगितलेले शब्द अखेरचे ठरले. वडिलांच्या सूचनेवर, 'नाही, मी जाऊन येतो,' असे म्हणत धुळ्याकडे निघालेल्या तारखेडा (ता. पाचोरा) येथील यश गणेश पाटील (वय १९) या तरुण विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. जामदा (ता. चाळीसगाव) रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर पडलेला मोबाईल उचलण्याच्या प्रयत्नात शनिवारी (ता. ८) सकाळी साडेसहाला हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com