Jalgaon News : शेतकऱ्यांच्या खात्यात 27 कोटी वर्ग; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने स्थानिक नैसर्गिक आपत्तींतर्गत मदत

Jalgaon : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत मागील खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.
Gulabrao Patil
Gulabrao Patil esakal

Jalgaon News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत मागील खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. एक रुपयात पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत मिड सीजन ॲडव्हर्सिटी २५ टक्के अग्रीम जवळपास ८२ कोटी ५२ लाख वितरित झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तींतर्गत जिल्ह्यातील पात्र १ लाख ३६ हजार ९३१ शेतकऱ्यांना ५० कोटी १५ लाख रुपये मंजूर झाले. (27 crores in farmers account due to efforts of Guardian Minister )

मंजूर रकमेपैकी २७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली आहे. उर्वरित रक्कम कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे, तसेच उत्पन्नावर आधारित झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी, यासाठी पालकमंत्री पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली, तरी विमा हप्ता नाममात्र एक रुपया असल्याने सर्व शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. (latest marathi news)

Gulabrao Patil
Jalgaon News : मामाने केला भाचीचा विनयभंग; चाळीसगाव तालुक्यातील घटना

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै असली, तरी पीकविमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित सहभाग नोंदवावा. आपले सरकार सुविधा केंद्रधारकास विमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज ४० रुपयांप्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

Gulabrao Patil
Jalgaon News : जामनेरच्या 8 खेळाडूंचा स्केटिंग स्पर्धेत विश्वविक्रम; ‘गीनिज बुक’मध्ये नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com