Jalgaon News : पर्यटन विकासाठी अमळनेरला 3 कोटी; वर्णेश्वर संस्थानसाठी 50 लाख

Jalgaon News : अमळनेर मतदारसंघात ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
Minister Anil Bhaidas Patil
Minister Anil Bhaidas Patilesakal

Jalgaon News : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

महाशिवरात्रीनिमित्ताने श्री अनिल पाटील हे वर्णेश्वर मंदिर आणि खिचपुरी महोत्सवात गेले असता त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी निधी देण्याचे जाहीर केले होते. (Jalgaon 3 crore to Amalner for tourism development)

त्यानंतर १५ दिवसात मतदारसंघातील अनेक कामांसाठी निधी मिळवला. अमळनेर तालुक्यातील मौजे पाडसे, येथील भवानी माता मंदिर चौक सुशोभीकरणासह अनुषंगिक कामे (१० लाख), झाडी येथील महादेव मंदिर येथे सभामंडप (३० लाख), मौजे दळवेल (ता. पारोळा) येथील महादेव मंदिराचा सभामंडप (२५ लाख), अंचलवाडी येथे सभामंडप (२५ लाख).

बोदर्डे येथील शनि मंदीर चौक सुशोभिकरण (५ लाख), मौजे गलवाडे येथील म्हाळसादेवी मंदीर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लाख), निभोरा येथील राममंदीर येथे सुशोभिकरण (१० लाख), मठगव्हाण येथील विठ्ठमंदीर येथे संरक्षण भिंत बांधणे (१५ लाख), पिंपळे येथील नवनाथ व दत्तमंदीर येथे सभामंडप बांधकाम (२० लाख). (latest marathi news)

Minister Anil Bhaidas Patil
Jalgaon Municipality News : सामान्य बेघरांसाठी समता नगरात 816 घरांचा प्रकल्प; महापालिकेतर्फे उभारणी

आटाळे येथील भवानी मंदीर येथे चौक सुशोभीकरण व इतर आनुषंगिक कामे (५ लाख), कावपिंप्री येथील लहरोबावा सभामंडप बांधकाम करणे व इतर आनुषंगिक कामे करणे (१५ लाख), तरवाडे येथील धनदाई माता येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे (१० लक्ष).

जवखेडा येथील दत्त महाराज मंदिर येथे डोम सभामंडप बांधकाम करणे व इतर आनुषंगिक कामे करणे (२० लक्ष), ढेकू अंबासण येथील श्रीराम मंदिर येथे चौक सुशोभिकरण करणे (१० लाख) असे एकूण ३ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मदत झाल्याचे सांगितले.

Minister Anil Bhaidas Patil
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com