Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात 4 लाख बालकांना मिळणार ‘पोलिओ’ ची मात्रा

Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागात २ हजार ६८३ लसीकरण केंद्र स्थापन केले आहेत.
Polio Vaccination
Polio Vaccinationesakal

Jalgaon Polio Vaccination : येत्या रविवारी (ता.३) जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागात २ हजार ६८३ लसीकरण केंद्र स्थापन केले आहेत. त्यादिवशी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील अपेक्षित ४ लाख ३३ हजार १९८ बालकांना पोलिओ डोस दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओ मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे. (Jalgaon 4 lakh children will get polio Vaccination in district)

यापूर्वी राबविलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत झालेल्या लसीकरण कामांचा अनुभव लक्षात घेता यात स्थलांतरित लोकसंख्येतील काही बालके पोलिओ लसीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मजूर वसाहती, वीटभट्ट्या, साखर कारखाने.

ऊसतोड कामगार फिरस्ते कुटुंबे आदी ज्या भागात वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करण्यात यावी. अशा सर्व ठिकाणी मोबाईल टीमद्वारे लसीकरण केले जावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिल्या.

मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात, अंगणवाडी बूथ असलेल्या ठिकाणी अंगणवाडी सुरू ठेवावी. कार्यक्षेत्रातील ०-५ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थींना स्लीप वाटप व लस पाजण्यास आणण्याकामी सहकार्य करावे. शाळेच्या वर्गखोल्या आवश्यकतेनुसार बुथसाठी उपलब्ध करून द्याव्यात.

मोहीम कालावधीत आरोग्य केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित न करणे व लोडशेडिंग शिथिल करावे. मोहिमेचा व्यापक संदेश सर्व लोकांपर्यंत देण्यासाठी पोस्टर्स व बॅनर्स वाटप करण्यात आले आहेत. मोहीम काळात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वाहनाद्वारे मायकिंगद्वारे संदेश द्यावा असे आवाहन करण्यात आले. (latest marathi news)

Polio Vaccination
Jalgaon News : सामनेरला दहावीच्या परीक्षा केंद्रावर ‘मास कॉपी’

१९९५ पासून लसीकरण

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविण्यात येत आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहात. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही.

दोन थेंब दरवेळी, पोलिओवर विजय प्रत्येक वेळी

उच्चाटनाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे विशेष पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही मोहीम राबविली जाईल. ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना ४ ते ८ मार्चदरम्यान आयपीपीआय अंतर्गत घरभेटी, ट्रान्झिट टीमद्वारे पोलिओ डोस दिला जाईल.

प्लस पोलिओ मोहिमेची सुक्ष्म नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.विवेकानंद बिराजदार, डॉ. जयवंत मोरे इतर अधिकारी करीत आहेत.

Polio Vaccination
Jalgaon Unseasonal Rain Damage : मेहुणबारे परिसरात शुक्रवारी पुन्हा नुकसानीचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com