Jalgaon News : सुरतहून पळून आलेल्या 4 अल्पवयीन मुली सुखरूप! पालकांसोबत झालेल्या वादातून सोडले होते घर

Jalgaon News : मेसचालक आकाश लिधोरे यांना संशय आल्याने त्यांनी यासंदर्भात मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ या ठिकाणी पोलिस कर्मचारी पाठविले.
depressed girl
depressed girlesakal

मुक्ताईनगर : पालकांसोबत झालेल्या वादातून सुरतहून आपल्या घरून पळून आलेल्या चार अल्पवयीन मुलींना मुक्ताईनगर पोलिसांनी सुखरूप थांबविले असून, त्यांच्या पालकांना पाचारण करण्यात आले आहे.

सुरत येथील रहिवासी असलेल्या चार अल्पवयीन मुली आपल्या घरून निघून आल्या होत्या. या मुली मुक्ताईनगरातील जय भवानी मेस येथे मंगळवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास भोजनासाठी आल्या. मात्र, मेसचालक आकाश लिधोरे यांना संशय आल्याने त्यांनी यासंदर्भात मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ या ठिकाणी पोलिस कर्मचारी पाठविले. (Jalgaon 4 minor girls who escaped from Surat safe left home)

depressed girl
Refinery Project : 'नारायण राणे यांच्यापासून आमच्या जीवाला धोका, आमचं रक्षण करा'; राऊतांनी व्यक्त केली भीती

पोलिसांनी या मुलींची चौकशी केली असता, त्यांनी घरून पळून आल्याचे सांगितले. या मुली सुरतमधील पांडसरा परिसरातील रहिवासी असून, त्यांनी पालकांसोबतच्या वादातून घर सोडल्याचे सांगितले. मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने तेथील पोलिस ठाण्याच्या माध्यमातून या मुलीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना या प्रकारची माहिती दिली. तेथील पथकाच्या ताब्यात या मुलींना दिले असून, त्यांची महिला पोलिस कर्मचारी प्रज्ञा इंगळे यांनी सर्व प्रकारची काळजी घेतली.

दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे व पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खनके, पोलिस कर्मचारी लिलाधर भोई, प्रदीप इंगळे, सुरेश पाटील, सागर सावे, डिगंबर कोळी, चेतन महाजन, निखील नारखेडे आणि महिला पोलिस प्रज्ञा इंगळे यांच्या पथकाने केली.

depressed girl
Alandi Crime : नवरदेवाची फसवणूक! पहिले लग्न लपवून नवरीने केले दुसरे लग्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com