Jalgaon News: मेमध्ये 51 महसूली मंडलात सलग 45 अंश तापमान! 51 मंडलातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार 43 हजारांची भरपाई

Jalgaon News : सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत.
Banana
Bananaesakal

Jalgaon News : यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. यंदा मेमध्ये सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अतितापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी पिकाला बसला. सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले, तर ‘हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतंर्गत’ केळी उत्पादकांना नुकसानभरपाई शासन देते.

यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडले पात्र ठरली आहेत. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. (Jalgaon 51 revenue mandals in May Eligible farmers will get compensation)

यापूर्वी एप्रिल महिन्यात जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडले पात्र ठरली होती, तर कमी तापमानाच्या निकषात ३६ महसूल मंडले २६ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.

मेच्या जास्त तापमानाच्या निकषात पात्र महसूल मंडले

जळगाव तालुका : असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा

भडगाव तालुका : भडगाव, कोळगाव

चाळीसगाव तालुका : खडकी बुद्रुक, शिरसगाव

धरणगाव तालुका : धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद

एरंडोल तालुका : एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह

अमळनेर तालुका : अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे

पाचोरा तालुका : कुऱ्हाड बुद्रुक, पाचोरा

पारोळा तालुका : बहादरपूर, पारोळा, शेळावे, तामसवाडी

भुसावळ तालुका : वरणगाव

चोपडा तालुका : चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बुद्रुक, लासूर

जामनेर तालुका : जामनेर, नेरी बुद्रुक, शेंदुर्णी

मुक्ताईनगर तालुका : कुऱ्हे, मुक्ताईनगर

रावेर तालुका : ऐनपूर, खानापूर, खिर्डी बुद्रुक, खिरोदा, निंभोरा बुद्रुक, सावदा

(latest marathi news)

Banana
Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा कोल्हापुरातून पाठिंबा

"यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. मेमध्ये तापमान ४५ अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. सलग पाच दिवस तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील ५१ महसूल मंडल हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतंर्गत निकषात पात्र ठरली आहेत. या महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई मिळेल." - गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Banana
PM Modi Government: मोदींच्या मंत्रिमंडळातून २४ तासात बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणारा मंत्री कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com